Mining In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Mining : 5 खनिज ब्लॉक्ससाठी 16 कंपन्या इच्छुक

लिलाव प्रक्रिया 27 एप्रिलपर्यंत चालणार

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Mining Auction: राज्य सरकारच्या खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याच्या वतीने जाहीर केलेल्या आणखी पाच खनिज ब्लॉक्ससाठी 16 कंपन्या इच्छुक असल्याचे आज खात्याचे संचालक डॉ. सुरेश शानभोग यांनी जाहीर केले.

इच्छुक खाण कंपन्यांच्या प्रतिनिधींची प्री-बिडींग मीटिंग झाली. यामध्ये या 16 इच्छुक कंपन्या असल्याचे स्पष्ट झाले. 17 मार्चपर्यंत कंपन्यानी प्रत्येकी 5 लाख रुपये भरून खनिज लिलावात सहभागी होऊ शकतात.

ही लिलाव प्रक्रिया 27 एप्रिलपर्यंत चालेल. यासाठी एसबीआय कॅप आणि एमएसटीसी सक्रिय असून ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होत आहे.

पाच ब्लॉक्सची विक्री होणार

राज्य सरकारच्या खनिज आणि भूगर्भशास्त्र खात्याच्या वतीने पहिल्या चार खनिज ब्लॉकची यशस्वी विक्री केल्यानंतर आता आणखी 5 ब्लॉक्स विक्रीसाठी खुले करण्यात आले आहेत.

अडवलपाल - थिवी, कुडणे - करमळे, कुडणे, थिवी - पिर्ण, सुर्ल - सोनशी असे हे नवीन पाच खनिज ब्लॉक्स लिलावासाठी खुले केले आहेत. 27 मार्चपर्यंत बोलीधारकांना आपल्या निविदा दाखल करता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT