
Mahadayi Water Dispute: शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी ‘म्हादई’संदर्भातील उपक्रम, स्पर्धांमध्ये सहभागी होऊ नये, अशी ॲडव्हायझरी भागशिक्षण अधिकारी यांनी काढली होती.
याविषयी काल सेव्ह गोवा, सेव्ह म्हादई फ्रंटच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय (ॲडव्हायझरी) मागे घेत असल्याचे फ्रंटला सांगितले.
या ॲडव्हायझरीद्वारे विद्यालयातील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना म्हादईच्या उपक्रम, बैठक, कार्यक्रम किंवा स्पर्धेत सहभागी होण्यास मनाई करण्यात आली होती.
याशिवाय म्हादईसंदर्भात कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यासही बंदी घातली होती. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती.
आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन ताळ्यावर
सेव्ह गोवा, सेव्ह म्हादई फ्रंटच्या पदाधिकाऱ्यांनी म्हापशातील उत्तर गोवा शिक्षण कार्यालयात अधिकारी किरण चौकेकर यांची भेट घेत त्यांना धारेवर धरले. दिलेले निर्देश मागे घ्यावे, अन्यथा कार्यालयात बसून आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी चौकेकर यांनी ॲडव्हायझरीत बदल केले जातील, असे सांगितले.
मात्र, दुरुस्ती नको, ती पूर्णपणे रद्द करण्याची ताठर भूमिका फ्रंटने घेतली. त्यानंतर चर्चेअंती शेवटी हा निर्णय फ्रंटच्या समक्ष अधिकाऱ्यांनी मागे घेतल्याची माहिती महेश म्हांबरे, राजन घाटे यांनी माध्यमांना दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.