Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

Margao Dengue Case: मडगाव पालिकेतील 15 कर्मचाऱ्यांना डेंग्‍यूची लागण

Margao Dengue Case: मडगाव नगरपालिकेत डेंग्यूचा शिरकाव झाला असून पालिकेतील सुमारे 15 कर्मचाऱ्यांना डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

Margao Dengue Case: मडगाव नगरपालिकेत डेंग्यूचा शिरकाव झाला असून पालिकेतील सुमारे 15 कर्मचाऱ्यांना डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे पालिकेत गेल्या आठ दिवसांपासून अनेक कर्मचारी गैरहजर आहेत. याचा परिणाम प्रशासकीय कामावर होत असून, अनेक कामे खोळंबली आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून नगरपालिकेत अनेक कर्मचारी गैरहजर असल्याने पालिकेची अनेक प्रशासकीय कामे रखडली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेतील सुमारे 15 कर्मचाऱ्यांना डेंग्यूची लागण झाल्याने ते सुट्टीवर आहेत. तर काही कर्मचारी डेंग्यू होईल या भीतीपोटी अर्धा दिवस संपल्यावर पालिकेत येत आहेत.

मुख्याधिकारी कार्यालयाच्‍या बाहेर सुमारे 25 ते 30 लोक प्रतीक्षा करत बसलेले असतात. सोमवारी पालिकेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

पालिकेत विविध कामे मार्गी लावण्यास नागरिक हेलपाटे मारतात; परंतु काही कर्मचारी कामावर गैरहजर असल्याने अनेकांना माघारी फिरावे लागले.

दोन कर्मचाऱ्यांना डेंग्यू झाला होता. त्यापैकी एका महिला कर्मचाऱ्याची प्रकृती बरी झाल्याने त्या पालिकेत पुन्हा रुजू झाल्या आहेत. सध्या नोव्हेंबर व डिसेंबर महिना सुरू झाल्याने यावेळी कर्मचाऱ्यांना हक्काच्या रजा देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. या रजा आम्ही नाकारू शकत नाही. सोमवारी सुमारे 50 टक्के कर्मचारी रजेवर होते. मात्र, यापैकी कुणाला डेंग्यू झाला असल्याची आपल्याला कल्पना नाही.
- गौरीश शंखवाळकर, मुख्याधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT