Goa Accident Case: चालकाचा वाहन परवाना कालबाह्य

Goa Accident Case: वागातोर अपघात : कारचा विमाही संपला; कडक कारवाईची मागणी
Goa Accident Case
Goa Accident CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident Case: बेदरकारपणे कारगाडी चालविल्याने वागातोरमधील एका रिसॉर्टच्या मालकिणीचा शनिवारी (ता.११) सायंकाळी उशिरा अपघाती मृत्यू झाला होता.

या प्रकरणातील अटक केलेल्या संशयिताचा वैध वाहन (ड्रायव्हिंग) परवाना हा गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये तर कारचा विमा मागील ऑगस्ट 2023 मध्ये कालबाह्य झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Goa Accident Case
Dengue In Goa: डेंग्‍यू, डॉक्टरांच्‍या हलगर्जीपणाने घेतला चिमुकल्‍या मुलीचा बळी

पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले की, या अपघातप्रकरणी आम्ही संशयित चालकाविरुद्ध यापूर्वीच भादंसंचे 304 कलम जोडले असून, कारचालकाचा वाहन परवाना 13 ऑक्टोबर 2022 रोजी तर कारचा विमा गेल्या ऑगस्टमध्ये कालबाह्य झाला आहे. त्यामुळे कलम 304 हे समर्थनीय आहे.

शनिवार, 11रोजी वागातोर येथे संशयित सचिन वेणुगोपाल कुरूप (42, रा. आसगाव व मूळ : पुणे) याने निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे स्थानिक रेमेडिया रोमी आल्बुकेर्क (56) यांचा नाहक बळी गेला.

त्यांच्यावर सोमवारी (ता.१३) उशिरा येथील सेंट ॲंथनी चर्चच्या दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच, पंचसदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Goa Accident Case
Goa Comunidade: ‘कोमुनिदाद’वरील घरांना विरोधच!

दरम्यान, स्थानिकांनी या प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत हा अपघात नसून एकप्रकारे खून असल्याचा आरोप केला. तसेच संशयिताविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.

त्यानुसार, स्थानिकांनी रविवार व सोमवार असे दोन दिवस हणजूण पोलिस स्थानकावर मोर्चा नेत पोलिस प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला होता. या अपघातात रिसॉर्टमधील दोघे कर्मचारी किरकोळ जखमी झाले होते.

हणजूण पोलिसांनी संशयित कारचालक कुरूप याच्याविरोधात वाहन व विमा परवाना कालबाह्य झाल्याने मोटर वाहन कायद्याचे 3 व 196 हे अतिरिक्त कलम जोडले आहे. संशयिताचे रशियन महिलेसोबत लग्न झाले असून, मागील दहा वर्षांपासून तो आसगावमध्ये वास्तव्यास आहे.

ज्या हरियाणा नोंदणीकृत एसयूव्ही कारमुळे हा अपघात घडला, ही गाडी संशयिताने आपल्या मित्राकडून घेतली आहे. मात्र, अद्याप कार संशयिताच्या नावावर नाही. त्यामुळे हणजूण पोलिस कारमालकास कारणे दाखवा नोटीस काढणार आहेत. मागील तीन वर्षांपासून ही कार संशयिताजवळ आहे.

Goa Accident Case
CM Pramod Sawant: साखळी पालिकेतील दुकाने खुली करा

शुक्रवारी मिळेल ‘अल्कोहोल’ अहवाल

1 संशयित चार दिवसांच्या पोलिस कोठडीत असून, त्याने अपघातावेळी दारूचे प्राशन केले होते की नाही, हे अल्कोहोल चाचणी अहवाल आल्यानंतरच समजेल. शुक्रवारी (ता.१७) हा अहवाल येणे अपेक्षित आहे.

2 घटनेच्या दिवशी संशयित कारचालक हा ला-मायोर रोमा रिसॉर्टस्थळी आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता. या अपघातानंतर त्याच्या या मित्रानेच संशयिताच्या रशियन पत्नीला घटनास्थळी फोन करून बोलावून घेतले होते.

अपघातांत आतापर्यंत 25 बळी

जानेवारी 2023 ते आतापर्यंत हणजूण, म्हापसा, कळंगुट, साळगाव, कोलवाळ या पोलिस कार्यक्षेत्रात मिळून 25 जीवघेणे (फॅटल) अपघात घडले. तर किरकोळ 136 अपघात झाले. सर्वाधिक 10 बळी हे म्हापसा पोलिस कार्यक्षेत्रात गेले.

त्यानंतर, हणजूणमध्ये 7, कोलवाळमध्ये 6 तर कळंगुटमध्ये 2 बळी गेले. म्हापसा पोलिस क्षेत्रात 72किरकोळ अपघात तर हणजूणमध्ये 30 , कोलवाळ 28 , कळंगुट 4 व साळगावमध्ये 2 अपघात झाले आहेत. सुदैवाने साळगावमध्ये आतापर्यंत एकही अपघाती मृत्यू झालेला नाही.

पोलिस यंत्रणांना कायद्याच्या कक्षेत राहूनच एखाद्यावर कारवाई करावी लागते. त्यामुळे मद्यधुंद अवस्थेत वाहने हाकणाऱ्या चालकांची माहिती लोकांनी नजिकच्या पोलिस स्थानकाला अथवा नियंत्रण कक्षाला दिल्यास राज्यातील वाढत्या अपघातांना निश्चितच आळा बसू शकतो. यासाठी समाजमन जागृत होणे गरजेचे आहे.

- प्रशाल देसाई, निरीक्षक, हणजूण पोलिस

राज्यात येणाऱ्या पर्यटकांनी येथे आपल्या ताब्यातील वाहने हाकताना कुठल्याही प्रकारचा नशा करू नये. पर्यटकांच्या हाती आपल्या भाडोत्री वाहनांची चावी देताना स्थानिक रेंट-अ-कार तसेच दुचाकीवाल्यांनी रस्त्यांची माहिती तसेच वाहतुकीचे नियम त्यांना समजावून सांगावेत.

- गौरीश परब, निरीक्षक, हणजूण पोलिस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com