Sikkim Journalist Goa Tour Dainik Gomantak
गोवा

Sikkim Journalist Goa Tour: सिक्कीमच्या पत्रकारांना कुणबी साडीची भुरळ; 13 पत्रकार गोवा दौऱ्यावर...

ग्रीन स्कूलला भेट; स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाची घेतली माहिती

Akshay Nirmale

Sikkim Journalist in Goa: पूर्व भारतातील सिक्कीम या छोट्या राज्यातील 13 पत्रकार गेल्या काही दिवसांपासून गोवा दौऱ्यावर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी गोव्यातील विविध स्थळांना भेटी दिल्या आहेत.

आज, गुरूवारी 27 सप्टेंबर रोजी त्यांनी गोव्यातील एका हँडलूम यूनिटला भेट देत कुणबी साडीविषयी माहिती घेतली.

तसेच साखळी, विठ्ठलापूर येथील ग्रीन स्कूललाही त्यांनी भेट दिली. तसेच सुर्ला येथील ग्रामपंचायतीमध्ये स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाविषयी जाणून घेतले.

सुर्ला येथे स्थानिक लोक कुणबी साड्या विणतात. ज्या हातमागावर या साड्या विनल्या जातात त्या युनिटला या पत्रकारांनी भेट दिली. तेथील कारागिरांशी संवाद साधला. त्यानंतर स्वयंपूर्णा मित्रा यांनी त्यांना येथील कुणबी साडी युनिटबाबतची सर्व माहिती दिली.

तसेच सुर्ला ग्रामपंचायतीचे सरपंच, पंच सदस्य, जि. प. सदस्य यांच्याशी संवाद साधत त्यांनी स्वयंपूर्ण गोवा मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.

दरम्यान, विठ्ठलापूर साखळी येथील विठ्ठल रखुमाई शासकीय प्राथमिक शाळा जी देशभरात ग्रीन स्कूल म्हणून परिचीत आहे, तिथेही या पत्रकारांनी भेट दिली.

सिक्कीमची राजधानी गंगटोक येथील प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) चे 11 पत्रकार आणि 2 अधिकाऱ्यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे.

पीआयबी गुवाहाटीचे सहाय्यक संचालक प्रणव कुमार नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पीआयबी गोवा, डीआयपी गोवा यांच्या सहकार्याने या मीडिया टूरचे आयोजन केले आहे. गोव्यात राबविण्यात येत असलेल्या विविध सरकारी उपक्रमांची माहिती पत्रकारांनी घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT