CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Student: विद्यार्थी गणवेशासाठी 1.29 कोटींचा निधी पालकांच्या खात्यात: मुख्यमंत्री

Goa Student: आमदार विजय सरदेसाई यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Student: राज्यातील सरकारने गतवर्षी 2023-24 मध्ये प्राथमिक शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना रेनकोट आणि गणवेशासाठी 23 हजार विद्यार्थ्यांना 1 कोटी 29 लाख रुपयांचा निधी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती शिक्षण मंत्री तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहे.

आमदार विजय सरदेसाई यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले आहे. राज्य सरकार दरवर्षी सरकारी प्राथमिक शालेय विद्यार्थांना गणवेश आणि रेनकोट घेण्यासाठी पैसे देते. या योजनेनुसार वरील मदत दिली गेली आहे.

याशिवाय सरदेसाई यांनी माध्यान्ह आहाराविषयी काही प्रश्‍न विचारले आहेत, त्यात शाळांना दर्जेदार माध्यान्ह भोजन पुरवठा करण्यासाठी गोव्याने ‘अक्षय पात्र’सोबत भागीदारी केली आहे; तसे असल्यास, ज्या शाळांना माध्यान्ह भोजन दिले जाते त्यांची नावे, जेवणाच्या वस्तूंची यादी आणि जेवणाचा दर मागितला होता.

त्यावर शिक्षणमंत्र्यांनी उत्तर देताना पंतप्रधान पोषण आहाराअंतर्गत दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहार अक्षय पात्राचे जेवण 5 हजार विद्यार्थ्यांना पोहोचले जाते. त्यात प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी 8 रुपये आणि माध्यमिकसाठी 10 रुपये असा दर निश्‍चित केला आहे. तसेच केंद्राकडून यासाठी 1,363.49 लाख रुपये निधी मिळाला असल्याचे आणि याशिवाय उत्तर गोव्यातील तालुकानिहाय वाटप झालेल्या आणि देय बाकी असलेल्या स्वयंसाह्य गटाचे तथा महिला मंडळांचे निधीचे वर्गीकरणही शिक्षण मंत्र्यांनी प्रश्‍नानुसार सादर केले आहे.

गतवर्षी ११हजार ५०० विद्यार्थ्यांना लाभ

गतवर्षी राज्यातील ११ हजार ५०० विद्यार्थ्यांना गणवेशासाठी प्रत्येकी ६०० रुपये देण्यात आले आहेत. एकूण ही रक्कम ६९ लाख एवढी दिली गेली आहे. १२ हजार विद्यार्थ्यांना रेनकोटसाठी मदत दिली गेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास ५०० रुपयांप्रमाणे ६० लाख रुपये लाभार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. याविषयी कॅगद्वारे लेखापरीक्षण झाले का, यावर ते झालेले नाही. मात्र, खात्याद्वारे नियमित अंतर्गत तपासण्या केल्या जातात. त्याचबरोबर कॅगद्वारे लेखापरीक्षण देखील केले जाईल, असे उत्तर दिले गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Job Scam: 18 वर्षीय तरुणाला नोकरीचं आमिष दाखवत निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक प्रकरण समोर, एक आरोपी अटकेत; दुसऱ्याचा शोध सुरू

Goa Cow Lovers Protest: गोवंशावर अन्‍याय करणाऱ्यांना तातडीने अटक करा; 12 दिवसांत गुरे सुरक्षितस्‍थळी हलवा; केपे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गोप्रेमींची मागणी

Mayde Gram Panchayat Waste Management: मयडे ग्रामपंचायतीतर्फे विद्यमान कचरा व्यवस्थापन प्रणालीच कायम ठेवण्याचा ठराव मंजूर

Exam System Decentralization: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर खरी परीक्षा सुरू

VIDEO: तरुणीला मागे बसवून झिगझॅग स्टाइलमध्ये चालवली बाइक; धोकादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT