PM Narendra Modi: लॉजिस्‍टीक हबद्वारे गोवा प्रगतिपथावर!

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी: बेतूल येथे दुसऱ्या भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे उद्‍घाटन
PM Narendra Modi Goa Visit
PM Narendra Modi Goa VisitDainik Gomantak

सुभाष महाले

PM Narendra Modi: ऊर्जा क्षेत्रात भारत स्‍वयंपूर्ण होत आहे. पारंपारिक स्त्रोतांबरोबरच अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. गोव्‍याची लॉजिस्‍टीक हबच्‍या माध्‍यमातून प्रगती होत आहे. पर्यावरणाशी सांगड घालून आपल्‍याला विकास साधायचा आहे, असा मूलमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेतूल येथे दिला.

भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करणे आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे, त्यांच्यात साखळीची रचना करणे, या उद्देशाने गोव्यात बेतुल येते 9 फेब्रुवारीपर्यंत ‘भारत ऊर्जा सप्ताह 2024 ’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरिदीपसिंग पुरी, गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी राज्यपाल श्रीधरन पिल्लई तसेच केंद्रीय पेट्रोलियम राज्य मंत्री उपस्थित होते.

‘भारत ऊर्जा सप्ताह 2024’च्‍या उद्‍घाटनप्रसंगी मोदी यांनी भारताचा ऊर्जा क्षेत्राशी निगडीत दूरदृष्टीकोन उपस्थितांसमोर मांडला. यावेळी ते म्‍हणाले, देशाने अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात उर्जा क्षेत्रात आर्थिक गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे.

PM Narendra Modi Goa Visit
Goa News: भू-रूपांतरासाठी नगरनियोजन कायद्यात होणार दुरुस्ती

त्याचप्रमाणे अन्य देशांच्या देशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. भारत ऊर्जा सप्ताह 2024 हे त्यासाठी गुंतवणूकदार व उद्योजकांना उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ आहे.आजपर्यंत उद्योग क्षेत्रातील नाविन्यपूर्ण शोध फक्त प्रयोगशाळेत रहात होते. मात्र आता त्याचा खऱ्या अर्थाने लाभ सामान्य जनतेपर्यंत पोचत आहे.

रस्ते, विमानसेवा,रेल्वे,जल वाहतूक यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिल्याने इंधनाची गरज वाढली आहे, त्यासाठी पर्यायी पर्यावरणाला पूरक ऊर्जा स्त्रोत विकसित करण्यावर सरकार भर देत आहे. भारत शाश्वत विकासावर भर देत आहे.पारंपरिक ज्ञान व नवीन तंत्रज्ञान यांची सांगड घालून वाढत्या ऊर्जा मागणीचा प्रश्न सोडविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. येणाऱ्या पाच- सहा वर्षांत प्रदूषण शून्य टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न आहे,असे मोदी यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com