Tenth standard result to be declared today in Goa  Dainik Gomantak
गोवा

धाकधूक वाढली; आज गोव्यात दहावीचा निकाल होणार जाहीर

दहावीची परीक्षा 31 परीक्षा केंद्र व 173 उपकेंद्रावर घेण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा शालांत मंडळाने गेल्या एप्रिलमध्ये घेतलेल्या दहावीचा निकाल आज बुधवार (ता.1 जून) रोजी संध्याकाळी 5:30 वा. जाहीर होणार आहे. निकालाची घोषणा होताच तो मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.gbshse.info) तो उपलब्ध असेल. एकूण 20,572 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. (10th board result to be declared today in Goa)

दहावीची परीक्षा 31 परीक्षा केंद्र व 173 उपकेंद्रावर घेण्यात आली होती. परीक्षेला एकूण 20,572 मुले बसली होती. त्यामध्ये 10,530 मुले तर 10,042 मुलींचा समावेश होता. काही दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारल्याचं चित्र होतं. आता दहावीच्या निकालातही तशीच पुनरावृत्ती होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गोवा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 92.66 टक्के लागला. यंदाही बारावीच्या परीक्षांमध्ये मुलींनी बाजी मारली असून 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 90.66 टक्के आहे. शिक्षण मंडळाने यंदा बारावीची परीक्षा दोन सत्रांत 18 केंद्र आणि 72 उपकेंद्रांवर घेतली होती. यासाठी राज्यभरातून 18 हजार 201 विद्यार्थी बसले होते. यापैकी कला शाखेमध्ये 4 हजार 754, वाणिज्य शाखेत 5 हजार 496, विज्ञान शाखेत 5 हजार 77 तर व्यावसायिक शाखेमध्ये 2 हजार 874 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT