Michael Lobo News
Michael Lobo NewsDainik Gomantak

बेकायदेशीर धर्मांतर करणारे लोक गोव्याच्या बाहेरून येतात : मायकल लोबो

बेकायदेशीर धर्मांतरामुळे दोन धर्मांमध्ये मतभेद निर्माण होतात : लोबो
Published on

म्हापसा: काँग्रेस पक्ष बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या लोकांचे कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही. आम्ही बेकायदेशीर धर्मांतराचा कडाडून विरोध करतो, असे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी सोमवारी स्पष्ट केले. (Congress do not support illegal conversions says Michael Lobo)

Michael Lobo News
जाणून घ्या गोव्यातील आजचे इंधनाचे दर

लोबो पुढे म्हणाले, "बेकायदेशीर धर्मांतरामुळे ख्रिश्चन धर्माचे नाव खराब होत आहे. यात कोणती मंडळी गुंतलेली आहेत ते मला दाखवा? गोव्यातील लोक यात सहभागी नाहीत. बेकायदेशीर धर्मांतर करणारे लोक गोव्याच्या बाहेरून येतात आणि प्रार्थना सभा आणि इतर उपक्रम करतात,” लोबो म्हणाले.

Michael Lobo News
सासष्टीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकास अटक

“ख्रिश्चन धर्मात प्रोटेस्टंट आणि इतर असे विविध पंथ आहेत. ते त्यांचा धर्म पुढे नेऊ शकतात पण धर्मांतर करू शकत नाहीत. ते लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करू शकतात. बेकायदेशीर धर्मांतरामुळे दोन धर्मांमध्ये मतभेद निर्माण होतात," लोबो पुढे म्हणाले.

गोव्यात असे उपक्रम मोठ्या प्रमाणावर होत नसल्याने धर्मांतरविरोधी विधेयकाची गरज नाही. भारतीय दंड संहितेअंतर्गत विविध कायदे आहेत आणि या समस्येला आळा घालण्यासाठी ते पुरेसे आहेत, असे मत देखील लोबो यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com