गोव्यात मॉन्सून उद्या धडकणार

हवामान खाते : पोषक स्थिती मिळाल्याने वेळेपूर्वीच वाटचाल
Goa Monsoon Update
Goa Monsoon UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेट समूहावर दाखल झालेला मॉन्सून राज्यात वेळेपूर्वीच दाखल होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. मॉन्सूनने राज्याशेजारी कारवारपर्यंत आगेकूच केली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मॉन्सूनपूर्व सरी राज्यात कोसळतील असा अंदाज आहे. दरम्यान, देशात सरासरीच्या 103 टक्के तर गोव्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.  भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज मंगळवारी (ता. 31) मॉन्सून हंगामाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. (Goa Monsoon Update)

Goa Monsoon Update
बेकायदेशीर धर्मांतर करणारे लोक गोव्याच्या बाहेरून येतात : मायकल लोबो

वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मॉन्सून 5 जूनपर्यंत सक्रिय होतो. मात्र, यंदा तो वेळेअगोदरच दाखल होईल. बंगालचा उपसागर आणि अंदमान निकोबारमध्ये यंदा सर्वात अगोदर म्हणजे 20 मे रोजी दाखल झाला होता. परंतू मध्यंतरी मॉन्सून दक्षिण अरबी समुद्रात प्रवास काहीसा रेंगाळला होता. आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांना मिळालेली गती, समुद्रावरून वाहणारी आद्रता आणि कमी उंचीवर निर्माण होणारे ढग व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा या सर्व पोषक स्थितीमुळे मॉन्सूनची वाटचाल वेळेआधीच होत आहे. आज मॉन्सूनने मध्य अरबी समुद्र, केरळचा संपूर्ण भूभाग, कर्नाटकातील कारवार, चिकमंगळूर, बंगळूर आणि तामिळनाडूतील काही भाग तसेच बंगालच्या उपसागराचा मध्य भाग व्यापला आहे. मॉन्सूनची ही स्थिती उद्यापर्यंत बदलून दोन ते तीन दिवसांत राज्यात दाखल होणार आहे.

यापूर्वी सर्वात लवकर 2011 साली मॉन्सून 3 जूनला राज्यात दाखल झाला होता. यंदाची स्थिती लक्षात घेतल्यास मान्सून 2 जूनपर्यंत राज्यात दाखल होऊ शकतो. कदाचित गेल्या दहा वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल. 2019 मध्ये 20 जूनला म्हणजे सर्वात उशिरा पाऊस आला होता.

आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकास्थित स्कायमेट संस्थाही भारतीय उपखंडातील मॉन्सूनचा अंदाज जाहीर करते. यंदा स्कायमेटनुसार अद्यापही मॉन्सून सक्रिय झालेला नाही. मॉन्सूनसाठी आवश्यक असलेली पोषक स्थिती अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात नाही असा स्कायमेटचा अंदाज आहे.

Goa Monsoon Update
जाणून घ्या गोव्यातील आजचे इंधनाचे दर

यंदा 103 टक्के पाऊस होणार

1 नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) काळात देशात सरासरीच्या 103 टक्के पावसाची शक्यता आहे. तर गोव्यातही सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली. विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी ही माहिती दिली.

2 यंदा मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) देशात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज असून, यामध्ये चार टक्के कमी-अधिक तफावत असू शकते. जूनमध्ये देशात 92 ते 108 टक्के पावसाचा अंदाज आहे.

मान्सूनने आज कारवार, चिकमंगळूर, बेंगलोर तमिळनाडूतील काही जिल्हे इथपर्यंतचा प्रवास केला आहे. मान्सूनसाठी आवश्यक असलेली पोषक स्थिती आणि अरबी समुद्रातील तयार होणारे कमी दाबाचे पट्टे लक्षात घेतल्यास मान्सूनची वाटचाल अशीच चालू राहील येत्या दोन दिवसात मान्सून गोवा आणि कोकणचा काही भाग व्यापेल अशी शक्यता आहे.

- एम.राहुल, हवामान अधिकारी गोवा वेधशाळा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com