Child Disappearance Goa Dainik Gomantak
गोवा

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

Goa Missing Children Statistics: पाच वर्षांत राज्यातून हरवलेल्या २५६ मुलांपैकी १०६ मुले सापडली, तर १५० मुले बेपत्ताच होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पाच वर्षांत राज्यातून हरवलेल्या २५६ मुलांपैकी १०६ मुले सापडली, तर १५० मुले बेपत्ताच होती, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी राज्यसभेतील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून समोर आली आहे.

२०२० ते २०२४ या काळात राज्यातून एकूण २५६ मुले हरवली. त्यातील १०६ मुले सापडली, तर १५० मुले २०२४ पर्यंत बेपत्ताच होती. या पाच वर्षांच्या काळात २०२४ मध्ये सर्वाधिक ५८ मुले हरवली होती, असे मंत्री बंदी संजय कुमार यांनी उत्तरातून सादर केलेल्या आकडेवारीतून दिसून येते.

दरम्यान, गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व जिल्ह्यांचा समावेश करून मानवी तस्करीविरोधी पथके अद्ययावत करण्यासाठी किंवा स्थापन करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक मदत दिली आहे. ही पथके हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे त्यांच्या घरी सोडत असल्याचेही मंत्री कुमार यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT