Goa POCSO Case: सात वर्षांच्या नात्यानंतर बलात्काराचा गुन्हा ग्राह्य नाही! 'पोक्सो' कोर्टानं फेटाळला आरोप; संशयित दोषमुक्त

Marriage Promise Sexual Assault Case: लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप असलेल्या डिचोली येथील २५ वर्षीय युवकाला पणजी येथील पोक्सो न्यायालयाने सर्व आरोपांतून दोषमुक्त केले आहे.
Goa POCSO Case
Goa POCSO court verdict in seven-year relationship caseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप असलेल्या डिचोली येथील २५ वर्षीय युवकाला पणजी येथील पोक्सो न्यायालयाने सर्व आरोपांतून दोषमुक्त केले आहे. तब्बल ७ वर्षे परस्पर सहमतीने राहिल्यानंतर केवळ नातेसंबंध बिघडल्यामुळे फसवणुकीचा किंवा बलात्काराचा गुन्हा दाखल करता येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

डिचोली तालुक्यातील एका तरुणाविरुद्ध महिलेने तक्रार दाखल केली होती. मार्च २०१८ ते एप्रिल २०२५ या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्न करण्यास नकार दिला, असा आरोप तक्रारदाराने केला होता. १५-१६ मे २०२५ रोजी संशयित मद्यधुंद अवस्थेत तक्रारदाराच्या घरी गेला व तेथे त्यांच्यात वाद झाला. या घटनेनंतर बसस्थानकावर झालेल्या वादानंतर तक्रार नोंदविली होती.

न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण

दोन्ही पक्षांमधील नातेसंबंध सुमारे ७ वर्षे सातत्याने सुरू होते. खुद्द पीडितेचे आई-वडील आणि भावाच्या साक्षीतून हे समोर आले की, संशयित सुरवातीला तिच्याशी विवाह करण्यास तयार होता. पीडितेच्या आक्रमक वर्तणुकीमुळे व कुटुंबातील सदस्यांचा अनादर करत असल्यामुळे संशयिताच्या कुटुंबीयांचा या विवाहाला विरोध होता.

पीडितेने तक्रारीच्या सुरवातीला ‘आम्ही एकमेकांना डेट करत होतो म्हणून शारीरिक संबंध आले’ असे नमूद केले होते. नातेसंबंध सुमारे ७ वर्षे सुरू होते. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांचे विधान लक्षात घेता, केवळ संशयिताने लग्नाचे वचन दिले म्हणूनच पीडितेने शारीरिक संबंध ठेवण्यास संमती दिली होती, असे म्हणता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com