Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Turtle : कासवाची १० पिल्ले सोडली समुद्रात; वन विभागाची कामगिरी

Goa Beach Turtle : गालजीबागला एकूण ५६ अंडी केली होती संरक्षित

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Beach Turtle :

काणकोण, गालजीबाग किनाऱ्यावर संरक्षित केलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाच्या अंड्यातून बाहेर पडलेल्या पहिल्या पिल्लांना आज समुद्रात सोडण्यात आले.

येथे एकूण ५६ अंडी संरक्षित केली होती, त्यापैकी दहा अंड्यातून पिल्ले बाहेर पडली. त्यांना सुरक्षितरित्या समुद्रात सोडण्यात आले, असे क्षेत्रीय वनाधिकारी राजेश नाईक यांनी सांगितले.

काणकोणमधील दोन सागरी कासव संवर्धन केंद्रात १०१ सागरी कासवांची अंडी संरक्षित केली आहेत. गालजीबाग येथे २७ तर आगोंद येथे ७४ अंडी संरक्षित केली आहेत. आगोंद येथील एका घरट्यातील सर्व अंड्यांची नासाडी झाली आहे, मात्र दुसऱ्या घरट्यातील १०३ अंड्यातून ७५ पिल्ले बाहेर आली. त्यांना सुरक्षितरित्या समुद्रात सोडण्यात आले.

गेल्या वर्षी काणकोणातील समुद्र किनाऱ्यावर ८९ सागरी कासवांचे आगमन झाले होते, मात्र यंदा ही संख्या १०१ वर गेली आहे. अजून सागरी कासवांच्या आगमनाला दोन महिन्यांचा अवकाश आहे. त्यामुळे यंदा जास्त सागरी कासवांचे आगमन होण्याची वन विभागाला अपेक्षा आहे, असे नाईक यांनी सांगितले.

रविवारी उत्तररात्री दीड वाजण्याच्या सुमारास गालजीबाग येथील घरटे क्रमांक एकमधून पिल्ले बाहेर आली. त्या घरट्यात एकूण ५६ अंडी संरक्षित केली होती. त्यामधून १० पिल्ले बाहेर आली. त्यांना लागलीच समुद्रात सोडण्यात आल्याचे क्षेत्रीय वनाधिकारी राजेश नाईक यांनी सांगितले.

किनाऱ्यावर वन विभागाचा पहारा

अंड्यातून पिल्ले बाहेर येताच ती लकाकणाऱ्या समुद्राच्या पाण्याच्या दिशेने झेपावतात, मात्र किनाऱ्यावर प्रकाशझोत असेल तर या पिल्लांचा गोंधळ उडतो.

त्यामुळे वन विभागाचे सुरक्षा रक्षक त्यांना सुरक्षितरित्या समुद्रात नेऊन सोडतात. या किनाऱ्यावर सध्या वन रक्षकांचा जागता पहारा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT