Goa Politics: ‘त्या’ तणावाला मंत्र्यांचे समर्थकही जबाबदार!

Goa Politics: सां जुझे आरियल येथील ग्रामस्थांचा दावा
Minister Subhash Phal Desai Attack
Minister Subhash Phal Desai AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सां जुझे द आरियल येथे १८ व १९ फेब्रुवारी रोजी जो तणाव झाला, त्याला समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि त्यांचे समर्थक जबाबदार आहेत. शिवाय त्यावेळी जे पोलिस अधिकारी व जिल्हाधिकारी उपस्थित होते, त्यांनीही हे प्रकरण सामोपचाराने सोडवायला हवे होते.

मात्र, मंत्र्यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला, असा आरोप स्थानिकांचे प्रतिनिधी पीटर व्हिएगस यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

यावेळी पंच कार्मिना फर्नांडिस, पंच ज्योयसी डायस, गाब्रिएल ओलिवेरा, पियेदाद कार्दोज उपस्थित होते.

यासंदर्भात आज स्थानिक ग्रामस्थ सां जुझे द आरियल पंचायतीबाहेर एकवटले आणि त्यांनी प्रश्र्न उपस्थित केला की, स्थानिकांवरच गुन्ह्याची नोंद का? तणाव तर गावाबाहेरून आलेल्या लोकांनी निर्माण केला होता. आम्ही तर इथलेच आहोत. आम्ही जाणार कुठे?

Minister Subhash Phal Desai Attack
Lok Sabha Election: नावे पोचली दिल्लीत; शिक्कामोर्तब बाकी

यासंदर्भात ग्रामस्थ सोमवारी सरपंच लिंडा फर्नांडिस यांना निवेदन सादर करणार असून या घटनेची सविस्तर चौकशी 15 दिवसांच्या आत करून अहवाल तयार करण्याची मागणी या निवेदनात केल्याचे व्हिएगस यांनी सांगितले. निवेदनाची प्रत उद्या सरपंचांना देण्यासाठी ती आज पंचांकडे सुपूर्द करण्यात आली.

मंत्र्यांवर हल्ला; दोषींवर कारवाई करा!

कुंकळ्ळी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना सां जुझे द आरियल येथे मंत्री फळदेसाई यांच्यावर जो हल्ला झाला, त्याचा अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज संघटनेने आमसभेत तीव्र निषेध केला. सर्व समाजबांधव मंत्री फळदेसाई यांच्यासोबत असून असले हीन प्रकार समाज सहन करणार नाही, असे समाजाच्या सदस्यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यास गंभीर परिणाम सहन करावे लागतील, असा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com