Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism 2023: पर्यटकांना लुटणाऱ्या 11 दलालांना अटक

Goa Tourism 2023: कळंगुट व परिसरातील पर्यटनात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने कळंगुट पोलिसांनी दलालांविरोधात सुरू केलेली मोहीम तीव्र करण्यात आली असून शनिवारी रात्री करण्यात आलेल्या धडक कारवाईत 11 दलालांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

दैनिक गोमन्तक

Goa Tourism 2023: कळंगुट व परिसरातील पर्यटनात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने कळंगुट पोलिसांनी दलालांविरोधात सुरू केलेली मोहीम तीव्र करण्यात आली असून शनिवारी रात्री करण्यात आलेल्या धडक कारवाईत 11 दलालांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

शनिवारच्या कारवाईत पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या दलालांमध्ये बहुतेक जुन्या आरोपींचाच समावेश असून त्यांना कडक शासन देण्याची मागणी होत आहे.

कळंगुट व परिसराला भेट देणाऱ्या देशी तसेच विदेशी पर्यटकांना खोटे आमिष दाखवून त्यांची लुबाडणूक करणे, त्यांना मारहाण करणे आदी प्रकार होत असल्याच्या वाढत्या तक्रारी आल्याने कळंगुट पोलिसांकडून २००२ पासून दलालांविरोधात विशेष धरपकड मोहीम हाती घेण्यात आली आहे.

मागच्या वर्षी या मोहिमेंतर्गत एकूण ४०० दलालांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.

यंदा आत्तापर्यंत ६०० हून अधिक दलालांच्या मुसक्या आवळण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी सांगितले.

पर्यटकांना लुबाडणाऱ्या दलालांच्या दंडात पाच हजारांवरून पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढ करणे आवश्यक आहे, तरच अशा लोकांना जरब बसेल. शनिवारी रात्री केलेल्या कारवाईत स्थानिक पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या दलालांपैकी बहुतेक दलाल जुनेच असल्याने त्यांना ठोठावण्यात येत असलेला पाच हजारांचा दंड किरकोळ आहे.
- सुदेश मयेकर, माजी उपसरपंच, कळंगुट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT