Goa Fraud News: अष्टगंधा पतसंस्थेत 8 कोटींचा घोटाळा!

Goa Fraud News: ठेवीदार: संचालक मंडळाविरुद्ध कारवाईची मागणी
Goa Fraud News
Goa Fraud NewsDainik Gomantak

Goa Fraud News: अस्नोडा येथील अष्टगंधा अर्बन सहकारी क्रेडिट संस्थेमध्‍ये सुमारे 8 कोटींचा घोटाळा व निधीचा गैरवापर झाल्याची तक्रार संतप्त ठेवीदारांनी या संस्थेच्‍या अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी आर्थिक गुन्हे कक्षाकडे (ईओसी) आज केली. ही तक्रार दाखल करताना ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Goa Fraud News
Goa Liberation: गोव्यातील मुक्तीनंतरचे स्थित्यंतर

या पतसंस्थेत अनेक गुंतवणूकदारांनी पैसे ठेवीच्या स्वरूपात गुंतवले आहेत. सहकार नियमांचे उल्लंघन करून ही संस्था मोठमोठी कर्जे वितरित करत आहे व गुंतवणूक केलेल्या निधीचा गैरवापर करत आहे. याप्रकरणी संस्थेच्या सुमारे 103 ठेवीदारांनी या तक्रारीसोबत सह्यांचे निवेदन दिले आहे.

या संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून तेथे सहकार निबंधक खात्यातील प्रशासकाची नियुक्ती केली असली तरी कोणतीच कारवाई होत नाही. त्या संचालक मंडळाला फक्त नोटिसा बजावून पुढील कारवाई झाली नसल्याचा आरोप या ठेवीदारांचा आहे, अशी माहिती ठेवीदारांच्यावतीने ॲड. साहील सरदेसाई यांनी दिली.

या संस्थेमध्ये ठेवी स्वरूपात रोख रक्कम गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांची मुदत संपली तरी व्याजासह रक्कम देण्यात येत नसल्याची तक्रार

1 फेब्रुवारी 2023 रोजी दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या प्रती संबंधित अधिकारिणी तसेच मुख्यमंत्री, पोलिस अधिकाऱ्यांकडेही देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याविरुद्ध कोणीच कारवाई केली नाही. त्यामुळे 31 जुलै 2023 रोजी उच्च न्यायालयात याचिका सादर करण्यात आली. 4 जानेवारी 2023 रोजी दाखल केलेली तक्रार निकालात काढण्याचे निर्देश न्यायालयाने सहकार निबंधकांना दिले होते. या निर्देशानुसार मंगेश फडते यांची तीन महिन्यांपूर्वी संस्थेवर प्रशासक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

‘गैरकारभार लपवण्याचा प्रयत्न’

संस्थेच्या संचालक मंडळाला हटवण्यात आले, तरी दस्तावेज समितीला देण्यास चालढकल होत आहे. तरीही प्रशासक समितीकडून कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यांना संस्थेच्या कारभारात हस्तक्षेप करण्यास दिला जात आहे.

मंडळाने केलेला घोटाळा तसेच गैरकारभार लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करून कारवाई सुरू करावी, अशी मागणी १०३ गुंतवणूकदारांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com