Air Pollution: करमळी पंचायतीजवळ ‘प्लॅस्टिक’ जाळले!

Air Pollution: व्हिडिओ व्हायरल: परिसरात चिंता, प्रदूषणाची शक्यता
 Air Pollution
Air PollutionDainik Gomantak

Air Pollution: करमळी पंचायत घराच्या जवळ असलेल्या प्लॅस्टिक कचऱ्याच्या ढिगाला जळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्लॅस्टिक कचरा जाळणे हे स्वास्थ आणि पर्यावरणासाठी हानिकारक आहे. त्याबाबत उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे सक्त दिशा निर्देश आहे. कचरा जाळल्याने झालेल्या प्रदूषणामुळे परिसरात चिंता वाढली आहे.

 Air Pollution
Traffic Issue: ‘विकेंड’मुळे गर्दी; पर्वरीत वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप

16 डिसेंबर रोजी करमळी पंचायत घराच्या शेजारी असलेल्या ठिकाणी प्लॅस्टिक कचऱ्याला आग लावलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता.

करमळी पंचायतीच्या शेजारी हा कचऱ्याचा ढीग असल्याने यावर देखील प्रश्न विचारले जात आहे. कचऱ्याची व्हिलेवाट लावण्यासाठी तर ही आग लावली नसेल, असा प्रश्न काही स्थानिकांनी विचारला.

करमळी तळ्याच्या अगदी जवळ हा कचरा असल्याने येथे स्थलांतरित पक्षी पाहण्यासाठी देशी आणि विदेशी पक्षीप्रेमी, वन्यजीव छायाचित्रकार येतात. अशाने गावाची छबी खराब होईल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

आग कोणी लावली?

कचऱ्याला आग कोणी लावली? हे अजून कळले नाही. कचरा न टाकण्याची सूचना देऊनही तेथे कचरा टाकला जात आहे. आता त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यासाठी पंधरवडा बैठकीत निर्णय देखील घेतला आहे, उपसरपंच रेश्‍मा मुरगावकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com