Suyash Prabhudesai Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vijay Hazare Trophy: 'सुयश'चे वेगवान अर्धशतक! रोमहर्षक सामन्यात गोव्याचा विजय; पहिल्याच सामन्यात धावांचा पाऊस

Vijay Hazare Trophy 2024-25: गोव्यातर्फे लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान अर्धशतक नोंदविण्याचा पराक्रम सुयश प्रभुदेसाई याने साधला. त्याने आकर्षक षटकार खेचत १७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Vijay Hazare Trophy Goa vs Odisha

पणजी: सामन्यातील दोन्ही डावांत मिळून ९९.४ षटकांत ७१५ धावांचा पाऊस पडलेल्या विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट लढतीत गोव्याने ओडिशाला २७ धावांनी हरविले. अ गट सामना शनिवारी जयपूर येथील डॉ. सोनी स्टेडियमवर झाला.

गोव्यातर्फे लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान अर्धशतक नोंदविण्याचा पराक्रम सुयश प्रभुदेसाई याने साधला. त्याने आकर्षक षटकार खेचत १७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. सुयश डावात एकही निर्धाव चेंडू खेळला नाही. एकंदरीत त्याने २२ चेंडूंत आठ चौकार व पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ७४ धावा केल्या. त्याने विकास सिंग याच्यासमवेत अखेरच्या ५.२ षटकांत पाचव्या विकेटसाठी ८७ धावांची अभेद्य भागीदारी केली.

त्यामुळे गोव्याने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर ४ बाद ३७१ धावा केल्या. याशिवाय स्नेहल कवठणकर (६७ धावा, ८१ चेंडू, ९ चौकार) व ईशान गडेकर (९३ धावा, ९६ चेंडू, १२ चौकार) यांनी गोव्याला १५९ धावांची भक्कम सलामी दिली. दोघेही सात धावांच्या फरकाने बाद झाल्यानंतर कर्णधार दर्शन मिसाळ (७९ धावा, ५६ चेंडू, ११ चौकार, १ षटकार) यानेही आक्रमक फलंदाजी करताना के. व्ही. सिद्धार्थ (३७) याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. ओडिशाच्या देबब्रत प्रधान याने १० षटकांत तब्बल १०८ धावा मोजल्या.

ओडिशानेही ३७२ धावांच्या आव्हानासमोर आक्रमक फलंदाजी केली, पण ४९.४ षटकांत त्यांचा डाव ३४४ धावांत संपुष्टात आला. स्वास्तिक समल (५७) व गौरव चौधरी (७८) यांनी १०७ धावांची सलामी दिल्यानंतर ओडिशाने ठराविक अंतराने गडी गमावले. कर्णधार संदीप पट्टनाईक (७३) धावबाद झाल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. गोव्यातर्फे डावखुरा वेगवान अर्जुन तेंडुलकर याने सर्वाधिक तीन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

गोवा ः ५० षटकांत ४ बाद ३७१ (स्नेहल कवठणकर ६७, ईशान गडेकर ९३, के. व्ही. सिद्धार्थ ३७, दर्शन मिसाळ ७९, सुयश प्रभुदेसाई नाबाद ७४, विकास सिंग नाबाद १३, अभिषेक राऊत २-४५) वि. वि. ओडिशा ः ४९.४ षटकांत सर्वबाद ३४४ (स्वास्तिक समल ५७, गौरव चौधरी ७८, संदीप पट्टनाईक ७३, कार्तिक बिस्वाल ४९, आशीर्वाद स्वेन ५३, अर्जुन तेंडुलकर १०-०-६१-३, फेलिक्स आलेमाव ४-०-३९-०, शुभम तारी १०-०-७४-२, दर्शन मिसाळ ८.४-०-५७-१, दीपराज गावकर ३-०-२३-१, मोहित रेडकर ७-०-४७-२, विकास सिंग ७-०-३७-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT