Narendra Modi, Vishwajit Rane
Narendra Modi, Vishwajit RaneX

Goa Cabinet: विश्‍वजीत राणेंना संभाव्य मंत्रिमंडळ बदलात मिळणार 'महत्त्वाचे' स्थान; PM मोदींच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला ऊत

Vishwajit Rane Meets Narendra Modi: आरोग्यमंत्री तथा मुख्यमंत्री पदाचे दावेदार विश्‍वजीत राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ संघटन सचिव बी. एल. संतोष यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे.
Published on

Vishwajit Rane Meets Narendra Modi

पणजी: आरोग्यमंत्री तथा मुख्यमंत्री पदाचे दावेदार विश्‍वजीत राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ संघटन सचिव बी. एल. संतोष यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. गोव्यात मंत्रिमंडळ बदलासाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून पक्षश्रेष्ठींना अंतिम निर्णय घेण्यासाठी अजून वेळ मिळालेला नाही; परंतु जेवढा अवधी जातो, तेवढे हे ‘बदल’ आणखी मोठे होतील, अशी शक्यता आहे.

सूत्रांच्या मते, विश्‍वजीत राणे यांच्याशी भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी कुवेतच्या दौऱ्यावर गेले आहेत. सध्या वर्षअखेर जवळ आल्याने दिल्लीत कोणी नेता उपस्थित नाही. त्यानंतर दिल्लीची निवडणूक तसेच बिहारच्या निवडणुकीची धामधूम सुरू होईल. त्यामुळे मंत्रिमंडळातील संभाव्य बदलास जानेवारीतच मुहूर्त लाभू शकतो.

विश्‍वजीत राणे हे पंतप्रधानांच्या भेटीसाठी गेले बरेच महिने प्रयत्न करीत होते; परंतु त्यांना मुलाखत मिळत नव्हती. राणे-मोदी भेट या घटनेला राजकीय वर्तुळात खूप महत्त्व दिले जातेय. विश्‍वजीत राणे गेली दोन वर्षे सरकारात तसेच पक्षात अत्यंत झटून कार्य करीत आहेत. त्यांनी कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्रात केलेले निवडणूक प्रचाराचे कार्य महत्त्वाचे मानले जाते व बी. एल. संतोष यांनी त्याकाळात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना सकारात्मक अहवाल दिला आहे. गोव्यात संघटनात्मक कार्यातही राणे यांनी करून दाखविलेले काम पक्षाला उभारी देणारे ठरले असल्याची ग्वाही पक्षश्रेष्ठींनी दिली आहे.

राणे यांच्या मोदी व संतोष यांच्या भेटीदरम्यान त्यांनी गोव्याच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चा केली. सरकारचे काही वादग्रस्त निर्णय, राष्ट्रीय पातळीवर गोव्यावर होत असलेली टीका व सरकारला लागलेले लांच्छन या विषयांवर राणे सविस्तर बोलले, अशी माहिती उपलब्ध झाली.

गोव्यात राजकीय बदल निश्‍चित केले जातील; परंतु ते कशा पद्धतीने होतील, याचा मात्र अंदाज पक्षश्रेष्ठींनी कोणाला दिलेला नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचेही पक्षश्रेष्ठींशी अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. आमदारांचा पाठिंबा पाहता, त्यांनी आपले स्थान भरभक्कम बनविले आहे, असा संदेश पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचविण्यात सावंत यशस्वी ठरले आहेत.

Narendra Modi, Vishwajit Rane
Goa Congress: जमीन हडप, नोकरी घोटाळा, सुलेमान खान फरार प्रकरण; सीएमच्या घरावर मोर्चा काढणारे काँग्रेस पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

शिवाय संघाशी संबंधित असल्याने सावंत यांना सध्या तरी पर्याय नाही, असे मानणारा एक वर्ग आहे.

मंत्रिमंडळातील किमान चार जणांना हटविण्याबाबत मतैक्य बनत असले तरी नव्याने कोणाचा समावेश करावा, याबाबत चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या मते, लोकसभा निवडणुकीतले कार्य हा महत्त्वाचा निकष मानला जाईल. विशेषत: दक्षिण गोव्यात झालेला पक्षाचा पराभव पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घेतला असून दक्षिणेतील अयशस्वी नेत्यांना मंत्रिमंडळात प्रवेश मिळविणे मुश्‍कील होईल. पक्षनिष्ठा, संघटन कार्य व २०२७ च्या निवडणुकीतील रचना हा मंत्रिमंडळ बदलातील महत्त्वाचा निकष मानला जाईल, अशी माहिती उपलब्ध झाली.

Narendra Modi, Vishwajit Rane
Goa Politics: चार्टर पॉलिटीक्स! गोव्याच्या राजकारणात जोरदार हालचाली; आमदार, मंत्र्यांच्या 'दिल्ली'वारी

मंत्रिमंडळ बदलाची वैशिष्ट्ये

विश्‍वजीत राणे यांना पंतप्रधानांकडून शाबासकी. पक्षाची विजयी पताका त्यांनी हातात घेतल्याचे पाहून संतोष वाटला, असे ते उदगारले.

बी. एल. संतोष यांनी राणेंच्या कामगिरीबद्दल सकारात्मक अहवाल पक्षश्रेष्ठींना दिला. राणेंमुळे पक्षाला चांगले भवितव्य असल्याचे संतोष यांचे मत.

विश्‍वजीत राणे यांना संभाव्य बदलात महत्त्वपूर्ण स्थान दिले जाणार असल्याचे संकेत. ते पद कोणते व खाती कोणती देणार, याबाबत मात्र गोपनीयता.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्यामागे बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा केला प्राप्त; पक्षश्रेष्ठींना सावंत यांच्या स्थानाची पुरेशी कल्पना. शिवाय संघाचा पाठिंबा.

सध्या दिल्लीत राजकीय घडामोडींना ऊत; परंतु दिल्ली व बिहार निवडणुकीवर लक्ष केंद्रित. गोव्याचा विषय जानेवारीतच चर्चेला येणार; परंतु गोव्यातील राजकीय वादग्रस्ततेवर मंत्रिमंडळातील बदलाचा आकार ठरणार!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com