India vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळली जाणारी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग आहे, ज्याची पुढील सायकल सुरु झाली आहे. भारतीय संघाने या नवीन सायकलमध्ये अद्याप आपले खाते उघडलेले नसले तरी आपल्या दुसऱ्याच सामन्यात एक मोठा पराक्रम केला. यापूर्वी, असा पराक्रम कधीही झाला नव्हता. भारतीय संघाने इतकी मोठी धावसंख्या उभारली की सगळेजण चकित झाले आहेत.
दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्या करण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये इंग्लंडने (England) मुल्तान येथे पाकिस्तानविरुद्ध 823 धावा केल्या होत्या. संघाची धावसंख्या इतकी मोठी होता की डाव सात विकेट्सवर घोषित करावा लागला. दुसरीकडे, भारतीय संघाबद्दल बोलायचे झाल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील त्यांचा सर्वोच्च धावसंख्या 601 आहे. 2019 मध्ये पुणे येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने हा धावांचा डोंगर उभारला होता. ही धावसंख्या अजूनही वर्ल्ड टेस्ट क्रिकेट स्पर्धेत भारताचा सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताने आता परदेशी भूमीवर सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे.
गेल्या वर्षी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता तेव्हा पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने 487 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने सहा विकेट गमावून या धावा केल्या आणि नंतर डाव घोषित केला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत परदेशातील भारताचा हा सर्वोच्च धावसंख्या होता. पण आता शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली एक नवीन कहाणी लिहिली गेली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाने 587 धावा केल्या आहेत. ही भारताची (India) परदेशातील सर्वोच्च आणि एकूण दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या आहे. भारताने कदाचित एवढी मोठी धावसंख्या केली असेल, पण संघ सामना जिंकला तरच त्याचा फायदा होईल. सध्या भारत मजबूत स्थितीत आहे, पण सामना संपेपर्यंत ही स्थिती कायम राखावी लागेल. त्यामुळे उर्वरित दिवसांत सामना कोणत्या दिशेने जातो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.