Manish Jadhav
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाची चमक दिसून आली.
जडेजाने शानदार फलंदाजी करत अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला बाहेर काढण्याचे काम केले. जडेजाचे शतक हुकले असले तरी त्याने एक मोठा कारनामा केला.
जडेजाने या स्पर्धेत 2000 धावा पूर्ण केल्या. जडेजाने आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 41 कसोटी सामने खेळले असून 2010 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने तीन शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे.
एवढेच नाही तर जडेजाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 2000 धावा आणि 100 विकेट्स घेतल्या आहेत. आता तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात 2000 धावा आणि 100 विकेट्स घेणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे.
भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना गमावला आहे, त्यामुळे हा सामना जिंकणे खूप महत्वाचे आहे.
जर मालिकेतील हा ही सामना गमावला तर येथून परतणे जवळजवळ अशक्य होईल. जरी फक्त दोन दिवस झाले असले तरी पहिल्या डावात 400 पेक्षा जास्त धावा करुन टीम इंडिया यावेळी निश्चितच आघाडीवर आहे.