Manish Jadhav
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेची सुरुवात टीम इंडियासाठी चांगली झाली नाही. पहिल्याच कसोटी सामन्यात गिल सेनेला 5 विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला.
आता दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळला जाणार आहे. टीम इंडिया मालिका 1-1 अशी बरोबरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
तथापि, बर्मिंगहॅममधील इंग्लंडच्या अतुलनीय आकडेवारीने कर्णधार गिल आणि संघ व्यवस्थापनाची झोप उडवली आहे.
एजबॅस्टनवर इंग्लंडचा रेकॉर्ड शानदार आहे. इंग्लंडने या मैदानावर आतापर्यंत एकूण 56 कसोटी सामने खेळले असून त्यापैकी 30 सामने संघाने जिंकले आहेत. त्याचवेळी, संघाने 11 सामने गमावले आहेत, तर 15 सामने अनिर्णित राहिले आहेत.
दरम्यान, या मैदानावर खेळलेल्या शेवटच्या कसोटीत इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 10 विकेट्सने पराभव केला होता. यजमान संघ 2023 मध्ये एजबॅस्टन येथे शेवटचा सामना खेळला होता.
इंग्लंड संघाचा हा रेकॉर्ड पाहून टीम इंडिया सध्या तणावात आहे. या मैदानावर इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनीही कमाल केली आहे. याशिवाय, इंग्लंडने एजबॅस्टनमध्ये एका डावात 710 धावाही केल्या आहेत.
इंग्लंड संघाचा एजबॅस्टनवरील रेकॉर्ड पाहता टीम इंडियासाठी विजय स्वप्नच राहील.
टीम इंडियाला आजपर्यंत एजबॅस्टनमध्ये एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही.