Goa Vs Nagaland Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Syed Mushtaq Ali Trophy: अखेरच्या सामन्यात गोव्याचा झंझावात! अष्टपैलू कामगिरीवर नागालँडला नमवले, फेलिक्सने नोंदवली विक्रमी हॅटट्रिक

Goa Vs Nagaland T 20: सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या ई गटातील गोव्याच्या मोहिमेचा समारोप विजयाने झाला. गुरुवारी नागालँडविरुद्धच्या लढतीत १०८ धावांनी दणदणीत विजय मिळविला. वेगवान फेलिक्स आलेमावची संस्मरणीय हॅटट्रिक आणि दर्शन मिसाळ व सुयश प्रभुदेसाई यांचा फलंदाजीतील झंझावात उल्लेखनीय ठरला.

गोमन्तक डिजिटल टीम

Syed Mushtaq Ali Trophy 2024 Goa Vs Nagaland Cricket Match

पणजी: सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या ई गटातील गोव्याच्या मोहिमेचा समारोप विजयाने झाला. गुरुवारी नागालँडविरुद्धच्या लढतीत १०८ धावांनी दणदणीत विजय मिळविला. वेगवान फेलिक्स आलेमावची संस्मरणीय हॅटट्रिक आणि दर्शन मिसाळ व सुयश प्रभुदेसाई यांचा फलंदाजीतील झंझावात उल्लेखनीय ठरला.

हैदराबाद येथे झालेल्या लढतीत फेलिक्सने सामन्यातील अखेरच्या तीन चेंडूंवर सलग गडी बाद करून बीसीसीआयच्या सर्वप्रकारच्या क्रिकेटमध्ये गोव्यातर्फे पहिली विक्रमी हॅटट्रिक साकारली. १९व्या षटकातील चौथ्या चेंडूवर फेलिक्सने अर्धशतकवीर चेतन बिस्त (६३) याला कश्यप बखले याच्याकरवी सीमारेषेजवळ झेलबाद केले. पाचव्या चेंडूवर नागाहो चिशी याच्या यष्टीचा वेध घेतला, तर अखेरच्या चेंडूवर ख्रिएव्हित्सो केन्से याचा त्रिफळा उडाला. या प्रयत्नात टी-२० क्रिकेट सामन्यातील डावात फेलिक्सने पाच गडी बाद केले.

गोव्याने २३८ धावांचे आव्हान दिल्यानंतर नागालँडचा डाव १२९ धावांत संपुष्टात आला. फेलिक्स व चार गडी बाद केलेल्या मोहित रेडकर यांनी नागालँडची सहाव्या षटकात ६ बाद २९ अशी दयनीय स्थिती केली होती. त्यानंतर चेतन बिस्तने झुंझार फलंदाजी करत नागालँडला शतक गाठून दिले. त्याने मोआकुमझुक त्झुदिर याच्यासमवेत आठव्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. बिस्त याने ४२ चेंडूंतील खेळीत पाच चौकार व तीन षटकार मारले. सलग चार पराभवानंतर गोव्याने अखेरचे दोन्ही सामने जिंकले.

संक्षिप्त धावफलक

गोवा ः २० षटकांत ६ बाद २३७ (अझान थोटा २८, ईशान गडेकर ९, कश्यप बखले २५, सुयश प्रभुदेसाई ६९, दर्शन मिसाळ ९१, विकास सिंग नाबाद ५, दीपराज गावकर ०, मोहित रेडकर नाबाद १, नागाहो चिशी ४-०-४५-२, इमलीवाट लेमतूर ४-०-५६-३) वि. वि. नागालँड ः २० षटकांत सर्वबाद १२९ (चेतन बिस्त ६३, इमलीवाटी तेमतूर २०, मोअकुमझुक त्झुदिर नाबाद १७, शुभम तारी ४-०-३४-१, मोहित रेडकर ४-०-१८-४, फेलिक्स आलेमाव ४-०-२४-५, दर्शन मिसाळ ४-०-३१-०, विकास सिंग ४-०-२१-०).

शतक नऊ धावांनी हुकले

नागालँडने प्रथम फलंदाजीस पाचारण केल्यानंतर गोव्याची दहाव्या षटकात ३ बाद ७५ अशी स्थिती होती, त्यानंतर यंदा स्पर्धेत सहा सामन्यांत चौथे अर्धशतक झळकावलेल्या सुयश प्रभुदेसाईने डावखुऱ्या दर्शन मिसाळसमेवत नागालँडच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढविला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी करून गोव्याला सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या गाठून दिली. सुयशने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. एकंदरीत त्याने ३३ चेंडूंत सहा चौकार व चार षटकारांसह ६९ धावा नोंदविल्या. दर्शनने २० चेंडूंत अर्धशतकी वेस ओलांडली, नंतर ११ चेंडूंत आणखी ३८ धावा केल्या, परंतु गोव्यातर्फे टी-२० क्रिकेटमधील सर्वांत वेगवान शतक त्याला अवघ्या नऊ धावांनी हुकले. डावातील दोन चेंडू बाकी असताना वरून मारलेल्या फटक्यावर दर्शन सीमारेषेजवळ झेलबाद झाला. त्याने ३१ चेंडूंत सात चौकार व आठ षटकारांच्या मदतीने ९१ धावा केल्या. त्याची कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.

गोव्यासाठी विक्रमी सामना

६ बाद २३७ ही टी-२० क्रिकेटमधील गोव्याची सर्वोच्च धावसंख्या, यापूर्वी १६ ऑक्टोबर २०२३ रोजी रांची येथे आंध्रविरुद्ध ६ बाद २३२ धावा

टी-२० सामन्यात गोव्यातर्फे सहाव्यांदा डावात २०० धावांचा टप्पा

हॅटट्रिक नोंदविणारा फेलिक्स आलेमाव टी-२० क्रिकेटमधील गोव्याचा पहिला गोलंदाज

टी-२० सामन्यातील डावात ५ गडी बाद करणारा फेलिक्स आलेमाव गोव्याचा चौथा गोलंदाज; यापूर्वी शदाब जकाती (५-१७), हेरंब परब (५-२४), मलिकसाब सिरूर (५-३३) यांची कामगिरी

सुयश प्रभुदेसाई व दर्शन मिसाळ यांची १२९ धावांची भागीदारी गोव्यातर्फे टी-२० क्रिकेटमध्ये चौथ्या विकेटसाठी सर्वोच्च

टी-२० सामन्यातील डावात दर्शन मिसाळचे ८ षटकार गोव्यातर्फे दुसऱ्या क्रमांकावर, यापूर्वी अमित वर्मा याचे २७ फेब्रुवारी २०१९ रोजी इंदूर येथे मध्य प्रदेशविरुद्ध डावात ९ षटकार

नागालँडवरील १०८ धावांनी विजय टी-२० क्रिकेटमधील गोव्याचा संयुक्त अव्वल, याअगोदर ४ एप्रिल २०१४ रोजी विशाखापट्टणम येथे कर्नाटकवर १०८ धावांनी मात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT