Suyash Prabhudesai, Vikas Singh Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Syed Mushtaq Ali Trophy: गोव्याचं 'सुयश', रोमहर्षक T 20 सामन्यात महाराष्ट्रावर तीन चेंडू राखून विजय

Syed Mushtaq Ali T20 Cricket Trophy: सुयश प्रभुदेसाईचे शानदार अर्धशतक आणि नंतर विकास सिंग याची आक्रमक फलंदाजी यामुळे सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याने महाराष्ट्रावर चार विकेट आणि तीन चेंडू राखून रोमहर्षक विजय नोंदविला.

गोमन्तक डिजिटल टीम

Syed Mushtaq Ali T20 Cricket Trophy 2024 Goa Vs Maharshtra

पणजी: सुयश प्रभुदेसाईचे शानदार अर्धशतक आणि नंतर विकास सिंग याची आक्रमक फलंदाजी यामुळे सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याने महाराष्ट्रावर चार विकेट आणि तीन चेंडू राखून रोमहर्षक विजय नोंदविला. डे-नाईट सामना मंगळवारी हैदराबाद येथे झाला.

सलग चार सामने गमावल्यानंतर गोव्याने ई गटात पहिलाच विजय नोंदविला. त्यांचा अखेरचा साखळी सामना पाच डिसेंबर रोजी नागालँडविरुद्ध होईल. महाराष्ट्राला पाच लढतीत तिसरा पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्राने ६ बाद १९३ धावा केल्यानंतर गोव्याने १९.३ षटकांत ६ बाद १९४ धावा केल्या.

गोव्याला विजयासाठी अखेरच्या दोन षटकांत ३५ धावांची गरज होती. आठ चेंडूंत २१ धावांची गरज असताना राजवर्धन हंगरगेकर याच्या गोलंदाजीवर दिव्यांग हिंगणेकर याच्याकरवी जम बसलेला सुयश झेलबाद झाला. मात्र, नंतर डावखुऱ्या विकासने कमाल केली. अर्शिन कुलकर्णी याने टाकलेल्या अखेरच्या षटकात गोव्याला १६ धावांची गरज होती. विकासने फटकेबाजी करताना अनुक्रमे ४, ४, ६ धावा केल्यानंतर अर्शिनने पुढचे दोन्ही चेंडू वाईड टाकले आणि गोव्याने विजयाची नोंद केली. विकास ३१ धावांवर नाबाद राहिला, त्याने नऊ चेंडूंतील खेळीत चार चौकार व दोन षटकार मारले.

सामन्याचा मानकरी ठरलेल्या सुयशने ४५ चेंडूंत आठ चौकार व एका षटकारासह ६६ धावा केल्या. त्याचे हे यावेळच्या स्पर्धेतील पाच डावातील तिसरे अर्धशतक ठरले. सुयशने कर्णधार दीपराज गावकर (२६) याच्यासमवेत चौथ्या वि केटसाठी ५६ धावांची भागीदारी केली, तर दर्शन मिसाळ याच्यासह पाचव्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. डावातील पहिल्याच षटकात मुकेश चौधरी याने ईशान गडेकर व कश्यप बखले यांना बाद केल्यामुळे गोव्याची २ बाद ० धावा अशी अतिशय खराब सुरवात झाली होती.

महाराष्ट्राची दमदार सलामी

त्यापूर्वी, गोव्याने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. सुरवातीची दोन षटके सावधपणे खेळल्यानंतर अर्शिन कुलकर्णी व अंकित बावणे यांनी गोव्याच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. त्यातच शुभम तारीच्या गोलंदाजीवर ईशान गडेकरने अर्शिनचा सोपा झेल सोडल्यामुळे महाराष्ट्राला फायदा झाला. अर्शिन (४४ धावा, २८ चेंडू, ३ चौकार, २ षटकार) व अंकित (५१ धावा, ४१ चेंडू, ६ चौकार, १ षटकार) यांनी महाराष्ट्राला अकराव्या षटकात ९७ धावांची सलामी दिली. अर्शिन धावबाद झाल्यामुळे ही जोडी फुटली.

२ निखिल नाईक (४० धावा, २२ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार) याने नंतर गोव्याच्या गोलंदाजांवर हल्ला चढविल्यामुळे महाराष्ट्राला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. निखिलने गोव्याचा फिरकी गोलंदाज मोहित रेडकर याच्या एकाच षटकात तीन षटकार मारले. १७व्या षटकानंतर पावसामुळे खेळ काही काळ थांबला, नंतर पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर महाराष्ट्राने चार विकेट गमावल्या व त्यांच्या धावगतीवर परिणाम झाला.

महाराष्ट्र २० षटकांत ६ बाद १९३ धावा (अर्शिन कुलकर्णी ४४, अंकित बावणे ५१, राहुल त्रिपाठी २४, निखिल नाईक ४०, धनराज शिंदे १६, दिव्यांग हिंगणेकर ४, ऋतुराज गायकवाड नाबाद २, राजवर्धन हंगरगेकर नाबाद २, शुभम तारी ४-०-२८-२, मोहित रेडकर ४-०-४८-०, फेलिक्स आलेमाव ४-०-३७-२, दर्शन मिसाळ

४-०-३०-०, दीपराज गावकर ३-०-३२-१, विकास सिंग १-०-१५-०) पराभूत वि. गोवा १९.३ षटकांत ६ बाद १९४ (ईशान गडेकर ०, अझान थोटा २३, कश्यप बखले ०, सुयश प्रभुदेसाई ६६, दीपराज गावकर २६, दर्शन मिसाळ २५, विकास सिंग नाबाद ३१, मोहित रेडकर नाबाद ४, मुकेश चौधरी ४-१-३३-३, राजवर्धन हंगरगेकर ४-०-४०-२, अर्शिन कुलकर्णी

३.३-०-४९-०, विकी ओत्सवाल ३-०-२९-०, प्रशांत सोळंकी ३-०-२१-०, दिव्यांग हिंगणेकर २-०-१५-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT