Super Cup, FC Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Super Cup 2025: FC Goa समोर पंजाब एफसीचे आव्हान, उपांत्य फेरीसाठी रंगणार सामना

FC Goa Vs Punjab FC: एफसी गोवाने आयएसएल स्पर्धेत चमकदार खेळ केल्यानंतर सुपर कपच्या ‘राऊंड ऑफ १६’ फेरीत गोकुळम केरळा संघावर तीन गोलने सहज विजय मिळविला.

Sameer Panditrao

पणजी: सुपर कप फुटबॉल स्पर्धेची उपांत्य गाठण्यासाठी एफसी गोवास शनिवारी (ता. २६) पंजाब एफसीचे धोकादायक आव्हान पार करावे लागेल. सामना रात्री आठ वाजता भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर खेळला जाईल.

एफसी गोवाने आयएसएल स्पर्धेत चमकदार खेळ केल्यानंतर सुपर कपच्या ‘राऊंड ऑफ १६’ फेरीत गोकुळम केरळा संघावर तीन गोलने सहज विजय मिळविला, तर पंजाब एफसीने माजी विजेत्या आणि गतउपविजेत्या ओडिशा एफसीला ३-० असा पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे एफसी गोवास शनिवारी पंजाब एफसीला कमी लेखता येणार नाही.

एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांना पंजाब एफसीच्या ताकदीची जाणीव आहे. ते म्हणाले, की ‘‘आयएसएलमध्ये पंजाब एफसीविरुद्ध खेळणे आमच्यासाठी नेहमीच कठीण ठरले आहे. यावेळच्या मोसमात फातोर्ड्यात त्यांच्याविरुद्ध जिंकताना आम्ही नशीबवान ठरलो, तर नवी दिल्लीत आम्ही निसटता विजय मिळविला. साहजिकच उद्याची लढत समतोल असेल. आम्ही त्यांचा मागील सामना पाहिला आहे. सध्या ते चांगले खेळत आहेत, तरीही आम्ही आशावादी आहोत. विजेतेपदाच्या दृष्टीने आम्ही पहिला सामना जिंकला आहे, आता आणखी तीन सामने जिंकणे बाकी आहेत.’’

भुवनेश्वरमधील पहिल्या सामन्यात एफसी गोवा संघ संध्याकाळी साडेचार वाजता खेळला, शनिवारचा सामना प्रकाशझोतात आहे. त्याबाबत मार्केझ म्हणाले, की ‘‘साडेचार वाजता तापमान जास्त होते, पण रात्री आठ वाजता तुलनेत कमी असेल. फुटबॉल खेळण्यास प्राधान्य देत कोणत्याही परिस्थितीत खेळण्यास सज्ज राहणे आवश्यक आहे.’’

आमने-सामने

एफसी गोवा व पंजाब एफसी यांच्यात आयएसएल स्पर्धेत ४ सामने

एफसी गोवाचे ३ विजय, १ लढत बरोबरीत

यंदा फातोर्डा येथे एफसी गोवा फातोर्डा येथे २-१, तर दिल्लीत १-० फरकाने विजयी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT