State Level Under 11 Chess Competition Selection Test Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Chess: आर्यव्रतची शानदार कामगिरी! आठवड्याभरात सलग दुसरे विजेतेपद

Under 11 Chess Competition: ११ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा-निवड चाचणीत आर्यव्रत नाईक देसाई याने खुल्या गटात, मुलींत त्विषा देसाई विजेती

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यस्तरीय ११ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा-निवड चाचणीत आर्यव्रत नाईक देसाई याने खुल्या गटात विजेतेपद पटकावले. आठवडाभरात तो सलग दुसऱ्या स्पर्धेत विजेता ठरला. मुलींत त्विषा देसाई विजेती ठरली. अव्वल कामगिरी केलेले दोन्ही खेळाडू काणकोण तालुक्यातील आहेत. स्पर्धा मळा-पणजी येथील महालक्ष्मी वाचन मंदिर सभागृहात झाली.

आर्यव्रत याने अव्वल स्थान राखताना सहा फेऱ्यांत अपराजित राहत सर्वाधिक साडेपाच गुणांची कमाई केली. मुलींच्या गटातील विजेत्या त्विषा हिने पाच गुणांसह अग्रस्थान मिळविले. खुल्या गटात शुभ बोरकर याचेही साडेपाच गुण झाले. टायब्रेकर गुणांत तो उपविजेता ठरला. अर्थव शिरोडकर याने पाच गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला. मुलींत दिया सावळ व काया कुतिन्हो यांचे प्रत्येकी पाच गुण झाले. टायब्रेकरमध्ये दिया हिला दुसरा, तर काया हिला तिसरा क्रमांक मिळाला.

खुल्या गटात विहान तारी, अथर्व बोरकर, रिशित गावस, जोशुआ तेलिस, सरस पोवार, रुद्र नगर्सेकर, सार्थक नाईक यांना, तर मुलींत कृतिका अगरवाल, स्कायला रॉड्रिग्ज, अस्मी तरसे, जेन्सिना सिक्वेरा, अवनी सावईकर व अर्णा सावंत यांना अनुक्रमे चौथा ते दहावा क्रमांक मिळाला.

सात व नऊ वर्षांखालील वयोगटात त्रिशा पटेकर, राघवी हळदणकर, सूर्वी केळोसकर, द्रिशा घोंगे, राही बुगडे, वानिया दुकळे, ब्रहामी मंगलासुली, नारायण प्रभुदेसाई, आरव नाईक, आर्यन नाईक, झाकारियस ग्रासियस, अथर्व घाटवळ, इव्हान डायस, शाफेर व्हिएगस, स्वास्तिक सोळंकी बक्षीसप्राप्त खेळाडू ठरले.

गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, सचिव आशेष केणी, खजिनदार विश्वास पिळर्णकर, महालक्ष्मी वाचन मंदिराचे सचिव नारायण पेडणेकर, तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे सचिव दत्ताराम पिंगे, स्पर्धेचे मुख्य आर्बिटर अरविंद म्हामल, आतिश आंगले, पल्लवी काकोडकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

शानदार सातत्य

आर्यव्रत नाईक देसाई याने यावर्षी शानदार फॉर्म प्रदर्शित केला आहे. गतआठवड्यात त्याने १३ वर्षांखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेच्या खुल्या गटात जेतेपद पटकावले होते. मागील महिन्यात तो राज्यस्तरीय सीनियर स्पर्धेत उपविजेता ठरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT