एक 'क्लिक' करताच दीड लाख गायब! सायबर चोरट्यानं चिखलीतील ज्येष्ठ नागरिकाला लुटलं; क्रेडिट कार्डचं डिटेल्स देणं पडलं महागात

Chicalim Online Fraud Case: चिखली येथील एका 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन सायबर चोरट्याने सव्वा लाख रुपयांहून अधिकचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली.
Chicalim Online Fraud Case
Goa Online FraudDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: चिखली येथील एका 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन सायबर चोरट्याने सव्वा लाख रुपयांहून अधिकचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली. जोसेफ मारियो लोपेस असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून एका सुपरमार्केटचा कर्मचारी असल्याचे भासवून चोरट्याने त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. या घटनेमुळे दक्षिण गोव्यात पुन्हा एकदा सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने लोपेस यांच्याशी संपर्क साधला आणि आपण एका नामवंत सुपरमार्केटमधून बोलत असल्याचे सांगितले. "बँकिंग व्यवहार अधिक सोपे आणि जलद होतील," असे आमिष दाखवून चोरट्याने लोपेस यांना एका लिंकवर क्लिक करण्यास प्रवृत्त केले. ही लिंक प्रत्यक्षात फसवणुकीचा सापळा होती. चोरट्याच्या गोड बोलण्याला भुलून लोपेस यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डचे गोपनीय माहिती शेअर केली. माहिती शेअर करताच, काही क्षणांतच त्यांच्या बँक खात्यातून 1,50,299 रुपये डेबिट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लोपेस यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली.

Chicalim Online Fraud Case
Goa Land Scam: गोव्यातील बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीचा खेळ खल्लास! SIT च्या धाकाने भूमाफिया पळाले; मुख्यमंत्री सावंतांचा दावा

वास्को (Vasco) पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 319(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक वैभव नाईक आणि उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निखिल देसाई या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. डिजिटल युगात ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढत असल्याने अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचे आणि बँक तपशील कोणाशीही शेअर न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Digital Arrest Fraud Case Goa
9 Arrested From Goa Cyber Crime
goa cyber crime raid fake call centre karmali arrests us citizens loan fraud
Cyber Fraud Case Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com