India vs Pakistan: 'अल्ला पाऊस पाड, 1 गुण मिळेल', पाकिस्तानी खेळाडूची देवाकडे प्रार्थना! मैदानात भिडण्यापूर्वीच पाकड्यांनी मानली हार
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधील सर्वात मोठा आणि हाय-व्होल्टेज सामना आज, १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यान कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या महामुकाबल्याकडे लागलेले असतानाच, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली याने केलेल्या एका विचित्र विधानामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारताच्या सध्याच्या फॉर्ममुळे बासित अली इतका घाबरला आहे की, त्याने चक्क निसर्गाकडेच साकडे घातले आहे.
पावसासाठी बासित अलीचे अजब साकडे
कोलंबोमध्ये आज पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. क्रिकेट चाहते प्रार्थना करत आहेत की पावसाने या सामन्यात व्यत्यय आणू नये. मात्र, एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर बोलताना बासित अलीने चक्क याच्या उलट इच्छा व्यक्त केली.
बासित म्हणाला, "अल्ला ताला पाऊस पाडू दे, अशी माझी दुआ (प्रार्थना) आहे." जेव्हा त्याला याचे कारण विचारले, तेव्हा बासित म्हणाला की, "पाऊस झाला तर सामना रद्द होईल आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण (पॉइंट) मिळेल." बासितच्या या विधानावरून त्याला भारताची किती भीती वाटत आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
भारताचा दबदबा
बासित अलीची ही भीती अनाठायी नाही. गेल्या काही वर्षांत भारतीय संघाने पाकिस्तानवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे. आशिया चषक २०२२ नंतर पाकिस्तानला आयसीसी किंवा आशिया चषकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला हरवता आलेले नाही.
विशेषतः २०२५ च्या आशिया चषकात भारताने पाकिस्तानचा सलग तीन वेळा पराभव करून आपली ताकद दाखवून दिली होती. हीच पार्श्वभूमी लक्षात घेता, बासित अलीला मैदानावरील लढतीपेक्षा पाऊस पडून गुण वाटून घेणे अधिक सुरक्षित वाटत आहे.
दोन्ही संघ सध्या या स्पर्धेत अजेय आहेत. भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही लयीत असून पाकिस्तानसाठी हे मोठे आव्हान असणार आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर एका रोमांचक सामन्याची अपेक्षा असली तरी, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा सावट कायम आहे. जर सामना झाला, तर भारत आपला विजयरथ कायम राखणार की पाकिस्तान अनपेक्षित उलटफेर करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

