पणजी: अखिल गोवा १३ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा-निवड चाचणीत खुल्या गटात आर्यव्रत नाईक देसाई याने, तर मुलींत साईजा देसाई हिने विजेतेपद पटकावले.
बार्देश तालुका बुद्धिबळ संघटनेतर्फे गोवा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने घेण्यात आलेली स्वातंत्र्यसैनिक दत्ताराम धुरी स्मृती स्पर्धा आसगाव येथील पीव्हीएसएसएम कुशे हायस्कूल जिमखाना सभागृहात झाली.
खुल्या गटात सरस पोवार याला दुसरा, कनिष्क सावंत याला तिसरा, तर एर्विन आल्बुकर्क, आरव चोपडेकर, विहान तारी, अथर्व बोरकर, जोशुआ तेलिस, अर्थव शिरोडकर, सचित पै यांनाअनुक्रमे चौथा ते दहावा क्रमांक मिळाला. मुलींत वैष्णवी परब उपविजेती ठरली, तर लिया सिल्वेरा हिला तिसरा क्रमांक मिळाला. स्कायला रॉड्रिग्ज, राचेल परेरा, इसरा रिकार्टी, जेनिस सिक्वेरा, दिया सावळ, सिद्धी नाईक, शिनेल रॉड्रिग्ज यांना अनुक्रं चौथा ते दहावा क्रमांक प्राप्त झाला.
वयोगटात शौर्य प्रभू अग्रासनी, शुभ बोरकर, रिशित गावस, श्रेष्ठ घोणसेकर, प्रयांक गावकर, इव्हान तेलिस, ह्रदय मोरजकर, रौनक लिंगुडकर, आरुष नाईक परुळेकर, रोचेल परेरा, दिया नाईक, शानवी रेडकर, अवनी सावईकर, शिवान्या राव, आराध्या देसाई, आराध्या राणे, कृतिका अगरवाल, स्वास्ती मोरजकर, यजवरी शेट्ये यांना बक्षीस मिळाले.
डीएम्स उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष किरण शिरोडकर, तसेच सुहास धुरी, महेश कांदोळकर, विश्वास पिळर्णकर, शिरीष दिवकर, डॉ. सुशांत धुळापकर, अरविंद म्हामल, सत्यवान हरमलकर, गोविंद शिरोडकर, रामचंद्र परब, सुधाकर पतगर, संस्कृती नारोजी, स्नेहल नाईक यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.