Sporting club goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League 2026: स्पोर्टिंग गोवा सकारात्मक दृष्टिकोनासह मैदानात, आय-लीग 2 चा थरार; घरच्या मैदानावर युनायटेड क्लबविरुद्ध लढत

Sporting club goa: आय-लीग २ स्पर्धेतील मोहिमेसाठी स्पोर्टिंग क्लब द गोवाने अनुभवी स्पॅनिश प्रशिक्षक फर्नांडो व्हारेला यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गतमोसमात स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाला आय-लीग २ फुटबॉल स्पर्धेतून पदोन्नती थोडक्यात हुकली होती, यंदा त्यांना सकारात्मक दृष्टिकोनासह मोहिमेस सुरवात करण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. स्पर्धेतील पहिला सामना शनिवारी (ता. २८) कुजिरा येथील अटल स्टेडियमवर संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून खेळला जाईल.

आय-लीग २ स्पर्धेतील मोहिमेसाठी स्पोर्टिंग क्लब द गोवाने अनुभवी स्पॅनिश प्रशिक्षक फर्नांडो व्हारेला यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला व्हारेला यांनी चांगल्या कामगिरीचा विश्वास व्यक्त केला.

आपला संघ स्पर्धेसाठी सज्ज असल्याचेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, की ‘‘आम्ही आक्रमक खेळण्याची शैलीचा अवलंब करू, त्याचवेळी सामन्यातील पूर्णवेळ आम्ही चेंडूवर वर्चस्व राखू शकणार नाही ही बाबही ध्यानात ठेवावी लागेल आणि त्या अनुषंगाने आम्हाला बचावात्मक पातळीवर सज्ज राहावे लागेल, तसेच पुन्हा चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी आक्रमक खेळावे लागेल.’’

व्हारेला पुढे म्हणाले, की ‘‘आमची मोसमपूर्व तयारी चांगली झाली आहे. संघाची स्पर्धात्मक मानसिकता असून स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाला योग्य ठिकाणी नेण्याचे ध्येय बाळगले आहे. विजयी मानसिकतेची जोपासना करणे मला आवडते. कठोर परिश्रम, मैदानाबाहेर शिस्त आणि आपण ज्या क्लबचे प्रतिनिधित्व करतो त्याबद्दल जागरूक राहणे, हे महत्त्वाचे आहे.’’ स्पोर्टिंग क्लब द गोवा संघ एकेरी साखळी पद्धतीने स्पर्धेत एकूण आठ सामने खेळणार आहे.

स्पोर्टिंग क्लब द गोवाचे वेळापत्रक

विरुद्ध युनायटेड स्पोर्टस क्लब (अटल स्टेडियम-कुजिरा), ता. ३ एप्रिल ः नेरोका एफसी (इंफाळ-मणिपूर), ता. ९ एप्रिल ः विरुद्ध कार्बी अँगलाँग मॉर्निंग स्टार (दिफू-आसाम), ता. १४ एप्रिल ः विरुद्ध सुदेवा दिल्ली एफसी (अटल स्टेडियम-कुजिरा), ता. २० एप्रिल ः विरुद्ध दिल्ली एफसी (चंडीगड), ता. २ मे ः विरुद्ध जीएमएससी (अटल स्टेडियम-कुजिरा), ता. ८ मे ः विरुद्ध एफसी बंगळूर युनायटेड (बंगळूर), ता. १५ मे ः विरुद्ध स्पोर्टिंग क्लब बंगळूर (अटल स्टेडियम-कुजिरा).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा फेकणाऱ्यांची नावे फोटोसह करणार प्रसिद्ध; 'हॉल ऑफ शेम' फेसबूक पेजची निर्मिती, हळदोण्यातील अस्वच्छतेविरोधात संताप

VIDEO: धावणे, पोहणे अन् शुद्ध हवा! अर्जुन रामपालने मुंबई सोडून गोव्यात का थाटला संसार? अभिनेत्यानं सांगितलं लाईफस्टाईलचं गुपित

Ishan Kishan troll CSK fans: चेपॉकवर 'Whistle Podu' स्टाईलने ईशानने चेन्नईला डिवचले, चाहत्यांना दिला 'घरी जाण्याचा' इशारा Video Viral

British Tourist Dead: कळंगूटमधील हॉटेलमध्ये ब्रिटीश नागरिकाचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू

Sanju Samson Record: एमएस धोनीचा 13 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त; संजू सॅमसनने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT