Goa Vs Kerala Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy: गोव्याचे भवितव्य फलंदाजांच्या हाती! केरळकडे 171 धावांची आघाडी; 'विष्णू'चे आक्रमक शतक

Goa Vs Kerala: कर्णधार विष्णू विनोद याच्या आक्रमक शतकामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ब गट सामन्यात केरळपाशी १७१ धावांची भक्कम आघाडी जमा झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कर्णधार विष्णू विनोद याच्या आक्रमक शतकामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ब गट सामन्यात केरळपाशी १७१ धावांची भक्कम आघाडी जमा झाली. आता सामन्याच्या अखेरच्या दिवशी गोव्याचे भवितव्य फलंदाजांच्या हाती असून त्यांनी जबाबदार संयमी फलंदाजी केली तरच यजमान संघ पराभव टाळू शकेल.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात रविवारी चौथा व अखेरचा दिवस निर्णायक असेल. पहिल्या डावात सहा गडी बाद केलेला केरळचा डावखुरा फिरकी गोलंदाज अंकित शर्मा याचा जास्त धोका गोव्याच्या फलंदाजांसमोर असेल. तिसऱ्या दिवसअखेर शनिवारी गोव्याने दुसऱ्या डावात चार षटकांत बिनबाद १८ धावा केल्या होत्या. ते अजून १५३ धावांनी मागे आहेत.

केरळने गोव्याच्या पहिल्या डावातील ३५५ धावांना उत्तर देताना दुसऱ्या दिवसअखेरच्या २ बाद २३७ वरून ९ बाद ५२६ धावांवर डाव घोषित केला. कालचा नाबाद शतकवीर राहुल कन्नुम्मल (१५३, २१३ चेंडू, १४ चौकार, ५ षटकार) याने दीडशतक केल्यानंतर विष्णू विनोद याने गोव्याच्या गोलंदाजांची पिसे काढताना आक्रमक शतक नोंदविले. विष्णूने १२८ चेंडूंत १४ चौकार व दोन षटकारांसह ११३ धावा केल्या. अमूल्य पांड्रेकरने त्याला पायचीत बाद केले. विष्णूने ११० चेंडूंत शतकी टप्पा गाठला होता.

केरळच्या डावात रोहन कन्नुम्मल व सलमान निझार यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. नंतर विष्णू विनोद व अहम्मद इम्रान यांनी पाचव्या विकेटसाठी ९३ धावांची, तर विष्णू व अंकित शर्मा यांनी सातव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली.

एन. पी. बासिल व एम. डी. निधीश यांनी अखेरच्या विकेटसाठी ३४ धावांची अभेद्य भागीदारी करून गोव्याच्या जखमेवर मीठ चोळले. गोव्याचा यष्टिरक्षक समर दुभाषी याने केरळची धावसंख्या ४९९ वरून असताना अमूल्य पांड्रेकरच्या गोलंदाजीवर एन. पी. बासिल याला यष्टिचीत केले असते, तर कदाचित पाहुण्या संघाला पाचशे धावांचा टप्पा गाठता आला नसता.

केरळच्या गोव्याविरुद्ध डावात सर्वोच्च धावा

९ बाद ५२६ घोषित ही केरळची गोव्याविरुद्धच्या २७ रणजी सामन्यांतील सर्वोच्च धावसंख्या ठरली. केरळने यापूर्वी १९८६ मध्ये तिरुअनंतपुरम येथे गोव्याविरुद्ध सर्वबाद ४८८ धावा केल्या होत्या. यावेळेस त्यांनी प्रथमच गोव्याविरुद्ध पाचशे धावांचा टप्पा ओलांडला.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ३५५

केरळ, पहिला डाव (२ बाद २३७ वरून) ः १३५ षटकांत ९ बाद ५२६ घोषित (रोहन कन्नुम्मल १५३, सलमान निझार ५२, विष्णू विनोद ११३, अहम्मद इम्रान ३१, मानव कृष्ण १२, अंकित शर्मा ३६, श्रीहरी नायर ४, एन. पी. बासिल नाबाद १३, एम. डी. निधीश नाबाद २०, अर्जुन तेंडुलकर २८-६-१०९-२, वासुकी कौशिक २६-७-६७-०, दर्शन मिसाळ २२-१-९३-०, ललित यादव ३१-३-११२-३, अमूल्य पांड्रेकर २१-०-८५-३, यश कसवणकर ६-०-३६-०, अभिनव तेजराणा १-०-९-०). गोवा, दुसरा डाव ः ४ षटकांत बिनबाद १८ (सुयश प्रभुदेसाई नाबाद १४, कश्यप बखले नाबाद ४).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT