Ranji Trophy: अर्जुन तेंडुलकर 1, तर राजशेखर शून्यावर बाद! 'दर्शन'ची एकाकी झुंज; गोव्याचा सलग तिसरा पराभव

Goa Vs Maharashtra: गहुंजे-पुणे येथे झालेल्या चार दिवसीय सामन्याच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने विजयासाठी आवश्यक १०८ धावा सहजपणे नोंदविताना उपाहारानंतर २ बाद १०९ धावा केल्या.
Goa Vs Maharashtra Ranji Cricket
Goa Vs Maharashtra Ranji CricketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अपेक्षेनुसार गोव्याला रविवारी सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्राने त्यांच्यावर एलिट ब गट सामन्यात आठ विकेट राखून दणदणीत विजय प्राप्त केला. त्यांचा फिरकी गोलंदाज जलज सक्सेना याने सामन्यात ११ गडी बाद करण्याचा पराक्रम साधला.

गहुंजे-पुणे येथे झालेल्या चार दिवसीय सामन्याच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने विजयासाठी आवश्यक १०८ धावा सहजपणे नोंदविताना उपाहारानंतर २ बाद १०९ धावा केल्या. अर्शिन कुलकर्णी याने ५१ चेंडूंत आक्रमक नाबाद ५२ धावा केल्या. त्यामुळे महाराष्ट्राला २१.१ षटकांतच विजयाची औपचारिकता पूर्ण करणे शक्य झाले.

महाराष्ट्राचा हा सहा सामन्यांतील तिसरा विजय ठरला. त्यांचे आता २४ गुण झाले आहेत.त्यांना आता आठ संघाच्या गटात अव्वल क्रमांक मिळाला आहे. गोव्यावरील विजयामुळे त्यांना सहा गुण मिळाले. तिसऱ्या पराभवामुळे गोव्याचे सहा लढतीनंतर ११ गुण कायम राहिले. गोव्याचा साखळी फेरीतील अखेरचा सामना २९ जानेवारीपासून पर्वरी येथे केरळविरुद्ध खेळला जाईल.

गोव्याचा दुसरा डाव ६ बाद २१० वरून रविवारी सकाळी २४८ धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावातील १४१ धावांच्या पिछाडीमुळे गोव्यापाशी एकूण १०७ धावांची आघाडी जमा झाली.

दर्शन मिसाळने किल्ला लढविला, परंतु त्याला अर्जुन तेंडुलकर (१) व राजशेखर हरिकांत (०) यांच्याकडून अजिबात साथ मिळाली नाही, त्यामुळे सामना वाचविणे गोव्यासाठी कठीण ठरले. राजशेखर सलग दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाल्यामुळे या लढतीत त्याला ‘चष्मा’ मिळाला.

दर्शन नवव्या विकेटच्या रुपात बाद झाला. जलज सक्सेनाने त्याला ऋतुराज गायकवाड याच्याकरवी झेलबाद केले. डावखुऱ्या दर्शनने २१२ चेंडूंतील संयमी खेळीत फक्त तीन चौकारांसह ६५ धावा केल्या.

Goa Vs Maharashtra Ranji Cricket
Ranji Trophy: महाराष्ट्राविरुद्ध गोवा पराभवाच्या खाईत! रनमशीन 'अभिनव'ची शतकी झुंज, इतर फलंदाजांची हाराकिरी

महाराष्ट्रातर्फे दुसऱ्या डावात ऑफस्पिनर जलज सक्सेना याने ८१ धावांत ५, तर डावखुरा फिरकी गोलंदाज हितेश वाळुंज याने ६३ धावांत ४ गडी टिपले. जलजने पहिल्या डावात ६ गडी बाद केले होते. ३९ वर्षीय ऑफस्पिनरने सामन्यात १६० धावांत ११ विकेट्स मिळविल्या.

Goa Vs Maharashtra Ranji Cricket
Ranji Trophy 2026: ऋतुराज गायकवाडचे झुंजार अर्धशतक, अर्जुन तेंडुलकरचे 2 बळी; गोव्याविरुद्ध महाराष्ट्र शतकी आघाडीच्या दिशेने

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः २०९

महाराष्ट्र, पहिला डाव ः ३५०

गोवा, दुसरा डाव (६ बाद २१० वरुन) ः ९७ षटकांत सर्वबाद २४८ (दर्शन मिसाळ ६५, अर्जुन तेंडुलकर १, राजशेखर हरिकांत ०, अमूल्य पांड्रेकर १४, वासुकी कौशिक नाबाद ७, जलज सक्सेना ५-८१, हितेश वाळुंज ४-६३).

महाराष्ट्र, दुसरा डाव ः २१.१ षटकांत २ बाद १०९ (पृथ्वी शॉ १७, नीरज जोशी २२, अर्शिन कुलकर्णी नाबाद ५२, सिद्धार्थ म्हात्रे नाबाद १४, वासुकी कौशिक २-०-११-०, ललित यादव ९-०-३४-१, दर्शन मिसाळ १.२-०-१२-१, अमूल्य पांड्रेकर ३.५-०-२९-०, अभिनव तेजराणा ५-०-२२-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com