Under 16 Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Under 16 Cricket: शौर्य चोडणकरची फिरकीची जादू! 6 विकेट्स घेत महाराष्ट्राच्या फलंदाजांना दिले धक्के

Maharashtra vs Goa Under 16 Cricket: लखनौ येथील जीसीआरजी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या एलिट ब गट सामन्यात बुधवारी खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राने ७ बाद ३४९ धावा केल्या होत्या.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याचा युवा ऑफस्पिनर शौर्य चोडणकरने शानदार कामगिरी बजावताना सहा गडी टिपले, तरीही महाराष्ट्राच्या फलंदाजांनी १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी वर्चस्व राखले.

लखनौ येथील जीसीआरजी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या एलिट ब गट सामन्यात बुधवारी खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राने ७ बाद ३४९ धावा केल्या होत्या. कर्णधार अर्णव पाटील (१४०) याने चमकदार शतक नोंदविताना श्रावण राठोड (७७) याच्यासमवेत संघाला १६८ धावांची सलामी दिली. महाराष्ट्राचा संघ सुस्थितीत असताना शौर्यने त्यांना धक्के दिले, त्यामुळे त्यांची ७ बाद २८९ अशी स्थिती झाली. महाराष्ट्राने १७ धावांत चार विकेट्स गमावल्या.

दिवसअखेर युवराज पंगारकर (नाबाद ३५) व कृश्वा गायकवाड (नाबाद ३२) यांनी आठव्या विकेटसाठी ६० धावांची अभेद्य भागीदारी करून महाराष्ट्राची स्थिती बळकट केली. गोव्याने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. गोलंदाजीत गोव्यातर्फे फक्त शौर्य उल्लेखनीय ठरला. त्याने २४ षटकांत ८१ धावा देत सहा गडी टिपले, तर एक बळी मृणाल नाईक याला मिळाला.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र, पहिला डाव : ९० षटकांत ७ बाद ३४९ (श्रावण राठोड ७७, अर्णव पाटील १४०, अर्जुन गायकवाड २०, व्हिवान हन्सालिया २६, युवराज पंगारकर नाबाद ३५, कृश्वा गायकवाड नाबाद ३२, हर्ष नैन १०-२-४८-०, दिगंत मनोहर २०-२-६६-०, तनिष्क नाईक ७-०-३१-०, मृणाल नाईक १५-२-५०-१, शौर्य चोडणकर २४-१-८१-६, स्पर्श गावस १०-२-३६-०, वंश कुडतरकर ३-०-२१-०, विश्राम परब १-०-८-०) विरुद्ध गोवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Boiled Eggs: अंडी उकडताना वारंवार फुटतात? पाण्यात टाका फक्त अर्धा चमचा हा पदार्थ; सोलतानाही होणार नाही त्रास

Indian Constitution: संविधान दिनाच्या दिवशीच लोकशाहीसमोर प्रश्न; संविधानाची फसवणूक तर होत नाही ना?

Rahu Ketu Gochar 2026: धनलाभ आणि प्रगतीचा योग! राहु-केतुच्या गोचरने 'या' 3 राशींचे चमकणार नशीब; आर्थिक स्थिती होणार भक्कम

Indian Constitution Day: 'संविधान हीच आमची शक्ती'; 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याचे मोदींचे आवाहन

Road Accident: 2 चिमुकल्या विद्यार्थिनींना अखेरचा निरोप; साकोर्डा अपघातानंतर 'साकवाला कठडे असते तर...'ची चर्चा

SCROLL FOR NEXT