Canacona Taluka Cricket Tournament 2026 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

कात्यायणी बाणेश्वर विद्यालय सलग तिसऱ्या वर्षी 'चॅम्‍पियन', काणकोण तालुका क्रिकेट स्‍पर्धेचे पटकावले विजेतेपद

Canacona Taluka Cricket Tournament 2026: कात्यायणी बाणेश्वर विद्यालयाने क्रिकेटमध्ये काणकोण तालुका पातळीवर सलग तिसरे विजेतेपद पटकावले.

गोमंतक ऑनलाईन टीम

आगोंद: कात्यायणी बाणेश्वर विद्यालयाने क्रिकेटमध्ये काणकोण तालुका पातळीवर सलग तिसरे विजेतेपद पटकावले. क्रीडा व युवा व्यवहार खात्यातर्फे आयोजित १४ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्‍यांनी गुरुकुल काजूमळ संघावर ४० धावांनी दमदार विजय मिळवला.

उपांत्यपूर्व फेरीत सेंट सेबॅस्टियन तर उपांत्य फेरीत सेंट थेरेसा संघाचा पराभव करत कात्यायणी बाणेश्‍‍वर संघाने अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद १३८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल गुरुकुल काजूमळ संघ २० षटकांत ९८ धावांत गारद झाला.

प्रजय गावकर याने ४४ धावा करत ४ बळी घेत उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी बजावली. मृदंग पागी याने ४१ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत झैद हांची याने २ बळी घेतले तर रक्षित सिंगो, ऋत्विक नाईक गावकर यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला.

या यशाबद्दल मुख्याध्यापिका पुष्पा देसाई, शारीरिक शिक्षक संतोष सतरकर, पीटीए अध्यक्ष सोबिता बोर्जीस तसेच शिक्षक, कर्मचारी व शुभेच्छुकांनी संघाचे अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Cattle Problem: मये भागात मोकाट गुरांचा उच्छाद! रस्त्यांवर मृत्यूचा सापळा; नागरिक प्रचंड दहशतीत

पूल नाही, फक्त लाकडी काठ्यांचा आधार! पावसाळ्यात बणकल गावातील ग्रामस्थांचा दरवर्षी मृत्यूशी खेळ; खासदारांकडून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी

Goa Green Zone: खोतीगावावर हरित क्षेत्राचे संकट! 1700 नागरिकांच्या अस्तित्वाची लढाई; 80 टक्के जमीन 'ग्रीन झोन' घोषित झाल्याने नागरिक चिंतेत

Goa Farming: मान्सूनपूर्व सरींचा अंदाज घेत गोव्यात खरिपाची लगबग; बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध

साडेसात लाख ग्राहकांचा प्रश्न! मानवाधिकार आयोगाच्या एका निर्णयाने वीज खात्याचे धाबे दणाणले; 'ॲमेकस क्युरी' ठवणार वीज बिल आणि मीटरचे भवितव्य

SCROLL FOR NEXT