Karun Nair Injury Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IND vs ENG Test: गिलसेनेला मोठा धक्का! दोन सामन्यात शानदार खेळी खेळणारा 'धाकड' जायबंदी

Karun Nair Injury: आता पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली. संघाचा स्टार खेळाडू करुण नायरला सराव सामन्यादरम्यान दुखापत झाली.

Manish Jadhav

Team India Setback: टीम इंडिया उद्या म्हणजेच 20 जून पासून इंग्लंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या नव्या सायकलला सुरुवात करणार आहे. भारताच्या या युवा संघाची खरी परीक्षा हेडिंग्ले, लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याने सुरु होईल. रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर. अश्विन यांच्या निवृत्तीनंतर टीम इंडिया एका संक्रमणाच्या टप्प्यातून जात असून या मालिकेत त्यांच्या क्षमतेची टेस्ट होणार आहे. तत्पूर्वी, कसोटी मालिकेला सुरुवात होण्यपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला.

दरम्यान, 2007 पासून भारताने इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. यावेळीही तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान असेल. तथापि, टीम इंडियात गुणवत्तेची कमतरता नाही. ते इंग्लंडला आव्हान देऊ शकतात. दुसरीकडे, करुण नायरला तब्बल 8 वर्षांनी टीम इंडियात स्थान मिळाले होते. तर साई सुदर्शनलाही फलंदाजी क्रमातील रिक्त जागा भरण्यासाठी पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळाले आहे.

करुण नायर दुखापतग्रस्त (Karun Nair Injured)

आता पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी (Team India) एक धक्कादायक बातमी समोर आली. संघाचा स्टार खेळाडू करुण नायरला सराव सामन्यादरम्यान दुखापत झाली. वृत्तानुसार, त्याच्या बरगडीला दुखापत झाली, ज्यामुळे तो मैदानाबाहेर गेला. त्याची दुखापत किती गंभीर आहे याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र जर तो इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळू शकला नाहीतर तो टीम इंडियाला मोठा धक्का असेल. सध्या करुण जबरदस्त फॉर्म आहे. त्याने इंग्लंड लायन्सविरुद्ध केवळ दोन सामन्यांमध्ये 259 धावा केल्या आहेत.

टीम कॉम्बिनेशनबाबत मोठा निर्णय

टीम इंडियासाठी बेस्ट कॉम्बिनेशन निवडणे हे मालिका जिंकण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली यांच्या जागी कोणत्या खेळाडूंना स्थान द्यायचे हे टीम मॅनेजमेंटसमोर सर्वात मोठे आव्हान असेल. केएल राहुल सलामीवीर किंवा टॉप ऑर्डरमध्ये खेळण्याची शक्यता आहे, तर शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. यानंतर, क्रमांक 3 आणि 6 साठी साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन आणि करुण नायर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

Money Laundering Case: धर्मांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड छंगूर बाबाच्या साम्राज्यावर ईडीचा घाला! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 13 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT