Jasprit Bumrah  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IND vs ENG: ‘जस्सी एक्सप्रेस’चा लॉर्ड्सवर धमाका! पुन्हा एकदा पाच विकेट्स घेत इंग्लिश फलंदाजांना पाजलं पाणी; कपिल देवचा मोडला रेकॉर्ड

Jasprit Bumrah Break Kapil Record: जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी करुन इंग्लंडच्या फलंदाजी युनिटला उद्ध्वस्त केले.

Manish Jadhav

Jasprit Bumrah Break Kapil Record: जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी करुन इंग्लंडच्या फलंदाजी युनिटला उद्ध्वस्त केले. लीड्स कसोटीनंतर बुमराहने आता लॉर्ड्स कसोटीतही एका डावात पाच बळी घेऊन क्रिकेट जगतातील सर्वात मोठ्या दिग्गजाचा रेकॉर्ड मोडला. या शानदार कामगिरीच्या जोरावर बुमराह परदेशी भूमीवर सर्वाधिक पाच बळी घेणारा गोलंदाज बनला. इतकंच नाहीतर बुमराहने त्याच्या कारकिर्दीत इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक वेळा पाच बळी घेतले. तिसऱ्या कसोटीतही बुमराहच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडची फलंदाजी युनिट्स निष्फळ ठरली.

बुमराहचा पंजा

दरम्यान, बुमराहने इंग्लंडविरुद्ध पहिल्या दिवशी फक्त एकच विकेट घेतली होती, पण दुसऱ्या दिवशी त्याने धमाका केला. त्याने पहिल्यांदा इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्सला आऊट केले. पुढच्याच चेंडूवर त्याने ख्रिस वोक्सची विकेट घेतली आणि त्यानंतर शतकवीर जो रुट त्याच्या जाळ्यात अडकला. बुमराहने 7 चेंडूत तीन तगड्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आर्चरला पॅव्हेलियनमध्ये धाडत बुमराहने पुन्हा एकदा पंजा खोलला.

जसप्रीत बुमराहचे स्वप्न पूर्ण झाले

बुमराहने इंग्लंडविरुद्ध (England) पाचव्यांदा पाच विकेट्स घेतल्या. कोणत्याही संघाविरुद्ध त्याचा हा सर्वोत्तम रेकॉर्ड आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. इतकेच नाहीतर इंग्लंडविरुद्ध त्याने सर्वाधिक कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. आता इंग्लंडविरुद्ध पाच विकेट्स घेऊन बुमराहचे स्वप्नही पूर्ण झाले. बुमराहने लॉर्ड्सवर पहिल्यांदाच पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. आता बुमराहचे नाव लॉर्ड्सच्या ऑनर बोर्डवर लिहिले जाईल, जे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज खेळाडूचे नाव ऑनर बोर्डमध्ये नाही.

बुमराहचा रेकॉर्ड

दुसरीकडे, बुमराह परदेशी भूमीवर सर्वाधिक 13 वेळा पाच विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने कपिल देवचा विक्रम मोडला. एवढेच नाहीतर त्याने आशियाई गोलंदाजांमध्ये वसीम अक्रमशी बरोबरी केली. वसीम अक्रमने सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये 11 वेळा पाच विकेट्स घेतल्या होत्या आणि आता बुमराहनेही हा आकडा गाठला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT