IND Vs ENG: शुभमन ठरणार लॉड्सचा बादशाह! गिलच्या निशाण्यावर डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना रेकॉर्ड; कराव्या लागणार 'इतक्या' धावा

Shubman Gill vs Don Bradman Record: टीम इंडियाचा युवा आणि नवा कर्णधार शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
Shubman Gill Double Century
Shubman Gill Dainik Gomantak
Published on
Updated on

Shubman Gill Record: टीम इंडियाचा युवा आणि नवा कर्णधार शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने शानदार फलंदाजी केली. टीम इंडियाने पहिला सामना गमावला असला तरी दुसऱ्या सामन्यात जबरदस्त कमबॅक केले.

सध्या इंग्लंडविरुद्ध (England) गिल अनेक नवे विक्रम करत आहे. आता पुढच्या सामन्यात म्हणजेच तिसऱ्या कसोटी सामन्यात गिलच्या निशाण्यावर दिग्गज क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम असणार आहे. यासाठी गिलला फारसे कष्ट करावे लागणार नाहीत. जर गिलने थोडीशीही मेहनत केली तर तो ब्रॅडमन यांना मागे टाकून विश्वविक्रम आपल्या नावावर करु शकतो.

Shubman Gill Double Century
Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

दरम्यान, नवीन विक्रम रचण्यासाठी गिल आता डॉन ब्रॅडमन यांच्या 88 वर्षांच्या जुन्या विक्रमावर लक्ष केंद्रित करेल. 1936 आणि 37 मध्ये अ‍ॅशेस दरम्यान डॉन ब्रॅडमन यांनी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना इंग्लंडविरुद्ध 810 धावा केल्या होत्या. ती मालिका पाच सामन्यांची होती. त्यानंतर डॉन ब्रॅडमन यांच्या बॅटमधून तीन शतके आली होती. दुसरीकडे गिलबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने या मालिकेतील दोन सामन्यांच्या चार डावात आतापर्यंत 585 धावा केल्या आहेत. याचा अर्थ जर गिलला ब्रॅडमनला मागे सोडायचे असेल तर त्याला 226 धावा कराव्या लागतील.

गिलकडे फक्त पुढची कसोटीच नाहीतर तीन सामने शिल्लक आहेत. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर गिलला यादरम्यान आणखी सहा डाव खेळण्याची संधी मिळू शकते. तथापि, गिल ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता, तो चौथ्या किंवा पाचव्या कसोटीची वाट पाहील असे वाटत नाही. लॉर्ड्सवर होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात 226 धावा करुन डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकण्याचा आणि नवीन विक्रम प्रस्थापित करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

Shubman Gill Double Century
Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

दुसरीकडे, 1936 मध्ये जेव्हा डॉन ब्रॅडमन यांनी हा विक्रम केला तेव्हा ते पहिल्यांदाच त्यांच्या संघाचे नेतृत्व करत होते. शुभमन गिलसोबतही असेच घडले आहे. तो पहिल्यांदाच कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, एका मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाबद्दल बोलायचे झाल्यास, डॉन ब्रॅडमन पहिल्या क्रमांकावर आहेत. 1930च्या कसोटी मालिकेत ब्रॅडमन यांनी 974 धावा केल्या होत्या. जर गिलने आणखी 391धावा केल्या तर तो कोणत्याही एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. त्यामुळे आता गिल कोणते नवीन विक्रम मोडतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com