Indian Super League 2026 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Indian Super League 2026: एफसी गोवा कोलकात्यात पुन्हा वरचढ? ईस्ट बंगालविरुद्ध रंगणार आयएसएल फुटबॉल सामना

FC Goa vs East Bengal ISL 2026: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अपराजीत असलेला एफसी गोवा संघ पुन्हा एकदा कोलकात्यातील मैदानावर वरचढ ठरणार का, या प्रश्नाचे उत्तर गुरुवारी (ता.५) मिळणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa vs East Bengal Match : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अपराजीत असलेला एफसी गोवा संघ पुन्हा एकदा कोलकात्यातील मैदानावर वरचढ ठरणार का, या प्रश्नाचे उत्तर गुरुवारी (ता.५) मिळणार आहे. त्यांचा सामना ईस्ट बंगालविरुद्ध विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर खेळला जाईल.

मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाने २० फेब्रुवारी रोजी कोलकात्यात मोहम्मेडन स्पोर्टिंगला २-० फरकाने पराभूत केले होते, तर गतमोसमात (२०२४-२५) त्यांनी ईस्ट बंगालला ३-२ फरकाने निसटते नमविले होते.

आता ईस्ट बंगालविरुद्ध खेळताना परिस्थिती बदलली आहे. ऑस्कर ब्रुझाँ यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगाल संघ आयएसएल स्पर्धेत परदेशी खेळाडूंच्या पूर्ण ताकदीसह खेळत असून एफसी गोवा संघाचा भर पूर्णतः भारतीय खेळाडूंवर आहे. गोव्यातील संघात फक्त दोघेच परदेशी खेळाडू आहेत.

एफसी गोवा संघाचे सध्या ३ सामन्यांतून सात गुण आहेत, तर मागील लढतीत जमशेदपूर एफसीविरुद्ध पराभूत झालेल्या ईस्ट बंगालचे तीन लढतीतून सहा गुण आहेत.

कोलकात्यास रवाना होण्यापूर्वी, पत्रकार परिषदेत एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी सांगितले, की ‘आमचे उद्दिष्ट प्रत्येक सामना जिंकण्याचे आहे. प्रतिस्पर्धी कोणीही असो, आम्ही पूर्ण तीन गुणांचे लक्ष्य बाळगूनच खेळतो.

ईस्ट बंगाल विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या संघांपैकी एक आहे, त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला कडवे आव्हान अपेक्षित आहे. आतापर्यंत आम्ही तीन सामन्यांतील नऊ पैकी सात गुणांची कमाई केली आहे. ही कामगिरी निश्चितच चांगली असल्याचे मी मानतो.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT