FC Goa team players | Manolo Marquez Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: विजयी कामगिरी हेच आमचे लक्ष्य! प्रशिक्षक मार्केझ सकारात्मक; मुंबई सिटीविरुद्ध FC Goa ने कसली कंबर

FC Goa Vs Mumbai City: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत मुंबई सिटीविरुद्ध एफसी गोवा संघाला सलग १३ सामन्यांत विजय नोंदविता आलेला नाही.

Sameer Panditrao

ISL 2024-25 FC Goa Vs Mumbai City

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत मुंबई सिटीविरुद्ध एफसी गोवा संघाला सलग १३ सामन्यांत विजय नोंदविता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. १२) त्यांचा सामना मुंबई येथे खेळला जाईल.

मुंबई सिटीविरुद्ध मागील पाच वर्षांत आयएसएल सामना जिंकणे शक्य झालेले नसले, तरी आपला संघ बुधवारी विजयी मानसिकतेनेच मैदानात उतरेल, असे एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी सामन्यासाठी रवाना होण्यापूर्वी सांगितले. ते म्हणाले, की ‘संघासाठी चांगला दिवस असेल, तर आम्ही कोत्याही संघाला पराभूत करू शकतो.

आमचा संघ निश्चितच तुल्यबळ आहे. शिल्ड जिंकणे शक्य नसल्यास आमचे लक्ष दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असेल. प्ले-ऑफजिंकून करंडक पटकावण्यासाठी, तसेच सुपर कप जिंकण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. विजयी कामगिरी हेच आमचे लक्ष्य आहे.’

एफसी गोवाचे सध्या १९ लढतींतून ३६ गुण असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या स्थानावरील मोहन बागान एफसीपेक्षा त्यांचे दहा गुण कमी आहेत. बुधवारी मुंबई सिटीने एफसी गोवास नमविले, तर सध्या ४६ गुण असलेल्या मोहन बागानचे शिल्ड विजेतेपद जवळपास निश्चित होईल. मुंबई सिटी प्ले-ऑफ फेरीतील जागा निश्चित करण्यासाठी इच्छुक आहे.

सध्या त्यांचे १९ लढतीतून ३१ गुण असून ते पाचव्या क्रमांकावर आहेत. जमशेदपूर एफसी ३४ गुणांसह तिसऱ्या, तर बंगळूर एफसी ३१ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. मागील लढतीत एफसी गोवाने ओडिशा एफसीला २-१ असे, तर मुंबई सिटीने नॉर्थईस्ट युनायटेडला २-० असे नमविले होते.

आयएसएल फुटबॉल स्पर्धेत २०१९ पासून एफसी गोवा संघाने मुंबई सिटीविरुद्ध सामना जिंकलेला नाही. सलग १३ सामने मुंबई सिटी एफसी गोवाविरुद्ध अपराजीत आहे.

एफसी गोवा संघाविरुद्ध मुंबई सिटीने आठ विजय व पाच बरोबरींची नोंद केली आहे. यंदा पहिल्या टप्प्यात १९ ऑक्टोबर २०२४ रोजी फातोर्डा येथे मुंबई सिटीने २-१ फरकाने बाजी मारली होती.

मैदानात उतरण्यापूर्वी...

यंदा आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचे ३५, तर मुंबई सिटीचे २४ गोल

एकमेकांविरुद्ध २७ सामने, मुंबई सिटीचे १२, एफसी गोवाचे ७ विजय, ८ बरोबर

यंदा आयएसएल स्पर्धेत यापूर्वीच्या सर्व १९ सामन्यांत गोल करण्याचा एफसी गोवाचा पराक्रम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT