ISL 2024-25 Canva
गोंयचें खेळामळ

Indian Super League: अपराजित एफसी गोव्याची संधी हुकली, हैदराबादसाठी पॉलिस्टाचा गोल ठरला निर्णायक

FC Goa Vs Hyderabad FC: हैदराबाद एफसीविरुद्धच्या १-१ गोलबरोबरीमुळे एफसी गोवाची इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील अपराजित मालिका नऊ सामन्यांपर्यंत गेली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: हैदराबाद एफसीविरुद्धच्या १-१ गोलबरोबरीमुळे एफसी गोवाची इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील अपराजित मालिका नऊ सामन्यांपर्यंत गेली, तरीही भरपाई वेळेत गोल स्वीकारल्याने दोन गुणांचे नुकसान झाल्यामुळे मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला दुसऱ्या क्रमांकाला मुकावे लागले. दोन्ही संघांतील प्रत्येकी एका खेळाडूस रेड कार्ड मिळालेला सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर बुधवारी झाला.

सामन्यात एफसी गोवाने वर्चस्व राखले, पण पूर्वार्धात त्यांना अचूक नेमबाजी साधण्यात अपयश आले. अल्बानियाचा आर्मांदो सादिकू याने स्पर्धेतील वैयक्तिक नववा गोल नोंदविताना एफसी गोवास ५२व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. ५९व्या मिनिटास बोर्हा हेर्रेरा याला थेट रेड कार्ड मिळाल्यामुळे एफसी गोवाचे सामर्थ्य दहा खेळाडूंवर आले. ७१व्या मिनिटास हैदराबादच्या ॲलेक्स साजी याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले, त्यामुळे त्यांचाही एक खेळाडू कमी झाला.

एफसी गोवा निसटत्या फरकाने सामना जिंकणार अशीच स्थिती असताना बदली खेळाडू ॲलन पॉलिस्टा याने ९०+२व्या मिनिटास हैदराबादला बरोबरी साधून दिली. यावेळी एफसी गोवाचा अनुभवी बचावपटू संदेश झिंगन याचा चेंडू रोखताना गोंधळ उडाला. त्यापूर्वी ८१व्या मिनिटास एफसी गोवाचा गोलरक्षक ह्रतीक तिवारी याच्या दक्षतेमुळे हैदराबादच्या पॉलिस्टाचा हेडिंग प्रयत्न यशस्वी ठरला नव्हता.

बरोबरीच्या एका गुणामुळे एफसी गोवाचे १४ सामन्यांतून २६ गुण झाले. त्यांची ही पाचवी बरोबरी ठरली. मोहन बागान (३२ गुण) व बंगळूर एफसी (२७ गुण) या संघानंतर एफसी गोवा आता तिसऱ्या स्थानी आहे. त्यांचा पुढील सामना १४ जानेवारीस नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध होईल. हैदराबाद एफसीची ही स्पर्धेतील तिसरी बरोबरी ठरली. १५ लढतीतून त्यांचे नऊ गुण झाले असून तेरा संघांत ते बाराव्या क्रमांकावर कायम राहिले.

दृष्टिक्षेपात सामना

आर्मांदो सादिकू याचे स्पर्धेतील १३ सामन्यांत ९ गोल

सलग ९ सामन्यांत ६ विजय व २ बरोबरींसह एफसी गोवा अपराजित

स्पर्धेतील खेळलेल्या सर्व १४ सामन्यांत गोल करण्याचा एफसी गोवाचा पराक्रम

घरच्या मैदानावरील ७ सामन्यांत एफसी गोवाचे ३ विजय, २ बरोबरी व २ पराभव

हैदराबाद एफसीविरुद्धच्या १२ आयएसएल सामन्यांत एफसी गोवाच्या ३ बरोबरी, अन्य ६ लढतीत विजय

भीती खरी ठरली

पूर्ण एकाग्रतेने मैदानावर पहिल्या मिनिटापासून खेळावे लागेल, नपेक्षा आव्हान धोकादायक ठरेल, असे एफसी गोवाचे (FC Goa) प्रशिक्षक मार्केझ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत नमूद केले होते. त्यांची ही भीती सामन्याच्या भरपाई वेळेत खरी ठरली. निलंबित बचावपटू ओडेई ओनाइंडिया याची अनुपस्थिती एफसी गोवास बुधवारच्या सामन्यात जाणवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT