FC Goa  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: रंगतदार सामना सुटला बरोबरीत! FC Goa च्या आघाडीनंतर यजमानांची जोरदार मुसंडी

FC Goa Vs Bangalore FC: इंडियन सुपर लीग फुटबॉल सामन्यात एफसी गोवापाशी दोन गोलची चांगली आघाडी होती, मात्र नंतर बंगळूर एफसीने जोरदार मुसंडी मारत १२ मिनिटांच्या अंतराने लागोपाठ गोल नोंदवून २-२ अशी बरोबरी साधली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामन्यात तासाभराच्या खेळानंतर एफसी गोवापाशी दोन गोलची चांगली आघाडी होती, मात्र नंतर बंगळूर एफसीने जोरदार मुसंडी मारत १२ मिनिटांच्या अंतराने लागोपाठ गोल नोंदवून २-२ अशी बरोबरी साधली. शनिवारी बंगळूर येथील श्री कांतीरावा स्टेडियमवर झालेली लढत रंगतदार ठरली.

संदेश झिंगनच्या हेडिंगमुळे एफसी गोवाने सातव्या मिनिटास एका गोलची आघाडी प्राप्त केली. फ्रीकिक फटक्यावर देयान द्राझिच याच्याकडून मिळालेल्या चेंडूवर भारताच्या आंतरराष्ट्रीय बचावपटूचे हेडिंग अचूक ठरले. नंतर ६६व्या मिनिटास साहिल ताव्होरा याने बॉक्सबाहेरून मारलेल्या शानदार फटक्यावर गोव्यातील संघाची आघाडी वाढली.

मात्र नंतर यजमान संघाने सामन्यातील सूत्रे हाती घेताना जोरदार प्रत्युत्तर दिले. रायन विल्यम्सने ७१व्या मिनिटास पिछाडी एका गोलने कमी केली. हर्ष पत्रे याच्या जागी मैदानात उतरलेल्या बदली विनीत व्यंकटेश याच्या असिस्टवर हा गोल झाला. ८३व्या मिनिटास बदली खेळाडू होर्गे परेरा दियाझ याने बंगळूरला एक गुण मिळवून देणारा गोल केला. रोशन सिंगच्या पासवर दियाझ याने संधी साधली. बंगळूर एफसी घरच्या मैदानावर सलग सातव्या लढतीत अपराजित राहिला.

एकंदरीत त्यांचे १२ सामन्यानंतर सात विजय, तीन बरोबरी व दोन पराभवानंतर २४ गुण झाले. एफसी गोवाने १९ गुणांसह ओडिशा एफसीला गाठले, गोलसरासरीत ते चौथ्या स्थानी आहेत. ११ लढतीत त्यांनी पाच विजय, चार बरोबरी व दोन पराभव अशी कामगिरी करताना सलग सहा सामने अपराजित राहण्याची किमया साधली. त्यांचा पुढील सामना २० डिसेंबर रोजी फातोर्डा येथे मोहन बागानविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT