FC Goa: 'एफसी गोवा'समोर बंगळूरचा कठीण पेपर; यजमानांविरुद्ध सातत्य राखण्याचे आव्हान

ISL 2024 25: बंगळूर एफसी व एफसी गोवा संघात सध्या पाच गुणांचा फरक आहे, तुलनेत बंगळूरचा संघ एक सामना जास्त खेळला आहे.
FC Goa ISL Match
Indian Super League Football: FC GoaDainik Gomantak
Published on
Updated on

ISL 2024 25 FC Goa Vs Bangalore FC Football Match

पणजी: मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघाने बरोबरीनंतर सलग चार विजय अशी पाच अपराजित सामन्यांची मालिका राखलेली असली, तरी आता त्यांच्यासाठी कठीण परीक्षेचा काळ सुरू होत आहे. शनिवारी (ता. १४) बंगळूर येथील श्री कांतीरावा स्टेडियमवर बंगळूर एफसीविरुद्ध सामन्यात कडव्या आव्हानास सामोरे जावे लागेल.

बंगळूर एफसी व एफसी गोवा संघात सध्या पाच गुणांचा फरक आहे, तुलनेत बंगळूरचा संघ एक सामना जास्त खेळला आहे. त्यांचे ११ सामन्यांतून २३ गुण, तर एफसी गोवाचे १० सामन्यांतून १८ गुण आहेत. सुमारे दीड महिन्यांपूर्वी फातोर्डा येथे एफसी गोवाने याच प्रतिस्पर्धी संघाचा ३-० फरकाने पाडाव केला होता.

FC Goa ISL Match
संतप्त टॅक्सी व्यावसायिकांनी अडवली गाडी; हरमल येथे खासगी कारमधून पर्यटकांची ने-आण; पोलिस, वाहतूक खात्याच्या कारभारावर टीका

बंगळूरवरील मागील विजयाविषयी मार्केझ म्हणाले, की ‘‘त्या विजयानंतर आमच्या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही, मात्र त्यांच्यासाठी (बंगळूर एफसी) परिस्थिती बदलली आहे. ते प्रत्येक सामन्यात वेगळ्या पद्धतीने खेळत आहेत. अगोदरच्या सामन्यात ते खूपच चांगले खेळले.’’ बंगळूरकडून आक्रमक खेळाची अपेक्षा प्रतिपादताना मार्केझ यांनी प्रतिस्पर्धी संघातील प्रमुख खेळाडू सुनील छेत्री, तसेच रायन विल्यम्स यांच्याकडून धोका असल्याचे नमूद केले.

FC Goa ISL Match
Vasco Akkalkot: स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी! वास्को ते अक्कलकोट थेट बससेवा सुरु

मैदानात उतरण्यापूर्वी...

आयएसएलमध्ये १६ लढती, बंगळूर एफसीचे ७, तर एफसी गोवाचे ५ विजय, ४ बरोबरी

पहिल्या टप्प्यात २ नोव्हेंबर २०२४ रोजी फातोर्डा येथे एफसी गोवा ३-० फरकाने विजयी

बंगळूरविरुद्ध एफसी गोवाचे सलग ३ विजय, २ विजय आयएसएलमध्ये, तर १ सुपर कपमध्ये

आयएसएलमधील मागील ५ सामन्यांत एफसी गोवाचे ४ विजय व १ बरोबरी

बंगळूर एफसीचे मागील ५ सामन्यांत २ विजय, २ पराभव, १ बरोबरी

घरच्या मैदानावर यंदा बंगळूर एफसीचे ६ सामन्यांत ५ विजय व १ बरोबरी

यंदा ५ अवे मैदानावरील सामन्यांत एफसी गोवा अपराजित, ३ विजय व २ बरोबरी

बंगळूर एफसीच्या ४० वर्षीय सुनील छेत्रीचे ११ सामन्यांत ८ गोल व १ असिस्ट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com