
Panaji News : यष्टिरक्षक शिवेंद्र भुजबळ २३ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेत गोव्याचे नेतृत्व करणार आहे. स्पर्धेसाठी १८ सदस्यीय संघाची घोषणा बुधवारी करण्यात आली. स्पर्धेत गोव्याचा ‘ड’ गटात समावेश असून झारखंड, मध्य प्रदेश, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, जम्मू-काश्मीर हे गटातील अन्य संघ आहेत. गोव्याची मोहीम १५ डिसेंबरपासून सुरू होईल. सामने छत्तीसगडमधील रायपूर व भिलाई येथे खेळले जातील.
कर्नल सी. के. नायडू करंडक चार दिवसीय सामन्यांच्या क्रिकेट स्पर्धेतील अगोदरच्या पाच सामन्यांत न खेळलेले गौरीश कांबळी, यश कसवणकर, कुतबुदिन जमादार, मनीष काकोडे, अमित यादव, मेहंक धारवाडकर, शौर्य जगलान यांना एकदिवसीय सामन्यांसाठी संघात स्थान मिळाले आहे.
संघ: अझान थोटा (उपकर्णधार), देवनकुमार चित्तेम, गौरीश कांबळी, आर्यन नार्वेकर, कौशल हट्टंगडी, यश कसवणकर, शिवेंद्र भुजबळ (कर्णधार), लखमेश पावणे, सनिकेत पालकर, कुतबुदिन जमादार, शदाब खान, शिवम सिंग, मनीष काकोडे, अमित यादव, आयुष वेर्लेकर, मयूर कानडे, मेहंक धारवाडकर, शौर्य जगलान.
गोव्याचे (Goa) सामने: तारीख १५ डिसेंबर ः विरुद्ध झारखंड (रायपूर), तारीख १७ डिसेंबर ः विरुद्ध मध्य प्रदेश (भिलाई), तारीख २१ डिसेंबर ः विरुद्ध कर्नाटक (रायपूर), तारीख २३ डिसेंबर ः विरुद्ध अरुणाचल प्रदेश (भिलाई), तारीख २५ डिसेंबर ः विरुद्ध ओडिशा (रायपूर), तारीख २७ डिसेंबर ः विरुद्ध जम्मू-काश्मीर (रायपूर).
अष्टपैलू यश कसवणकर याच्या १९ वर्षांखालील स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत निवड समितीने त्याला २३ वर्षांखालील संघात संधी दिली आहे. यश याने १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक चार दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील पाच सामन्यात ३७.५५च्या सरासरीने एक शतक व एक अर्धशतक नोंदविताना ३३८ धावा केल्या, तर फिरकी गोलंदाजीत १२ गडी बाद केले. त्यापूर्वी या वयोगटातील विनू मांकड करंडक एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत त्याने पाच लढतीत एका अर्धशतकासह १७७ धावा केल्या होत्या, तसेच आठ गडी टिपले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.