Rishabh Pant  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Rishabh Pant Record: दुसऱ्या डावात ऋषभ पंतचा पॉवरहाऊस परफॉर्मन्स! अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच 'विकेटकीपर'

Rishabh Pant World Record: भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऋषभ पंतने पहिल्या डावात शतक झळकावून आपला क्लास दाखवला होता.

Manish Jadhav

Rishabh Pant World Record: भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऋषभ पंतने पहिल्या डावात शतक झळकावून आपला क्लास दाखवला होता. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याच्याकडून शतकी खेळीची आपेक्षा होती. त्याने चाहत्यांची ही सुद्धा आपेक्षा पूर्ण केली. दुसऱ्या डावातही ऋषभने शतक झळकावले. त्याने केएल राहुलसोबत शानदार भागिदारी करत हे शतक झळकावले. ऋषभने पुन्हा एकदा आपला क्लास सिद्ध केला. त्याने आपल्या शतकी खेळीबरोबर शानदार रेकॉर्डही नोंदवला.

घराबाहेर कसोटीच्या दोन्ही डावात शतक

दरम्यान, ऋषभ आता घराबाहेर खेळताना कोणत्याही देशाविरुद्ध कसोटीच्या दोन्ही डावात शतक करणारा जगातील पहिलाच विकेटकीपर फलंदाज बनला. आजपर्यंत जगातील कोणताही विकेटकीपर फलंदाज कसोटीत असा पराक्रम करु शकला नाही. हे घराबाहेर घडले आहे. 2001 मध्ये, झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीच्या दोन्ही डावात शतक ठोकले होते. त्याने पहिल्या डावात 142 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात त्याने नाबाद 199 धावा केल्या होत्या.

आधी राहुल आणि नंतर पंतने शतक पूर्ण केले

आता ऋषभ पंत (Rishabh Pant) हा विकेटकीपर म्हणून खेळताना कसोटीच्या दोन्ही डावात शतक करणारा जगातील पहिला फलंदाज बनला. ऋषभ पंतच्या आधी केएल राहुलनेही दुसऱ्या डावात शतक पूर्ण केले. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे. लीड्स कसोटीचा चौथा दिवस सध्या सुरु आहे, परंतु आता असे वाटत नाही की टीम इंडिया येथून सामना गमावेल. सामना अनिर्णित राहू शकतो, परंतु येथून इंग्लंडच्या समस्या वाढत आहेत. सामन्यात आघाडी घेण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील.

दुसरीकडे, 2022 मध्ये जेव्हा टीम इंडिया (Team India) इंग्लंड दौऱ्यावर गेली होती तेव्हा त्याने बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीच्या एका डावात शतक झळकावले होते, तर दुसऱ्या डावात त्याने अर्धशतक झळकावले होते. आशियातील सात देशांमध्ये विकेटकीपर म्हणून अशी करणारा तो पहिला फलंदाज ठरला. पंतने 2022 मध्ये ही किमया साधली होती. आता तीन वर्षांनंतर पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर पंतने मोठा विश्वविक्रम केला.

लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात पंतने 134 धावांची दमदार खेळी खेळली होती. या दरम्यान पंतने 178 चेंडूंचा सामना केला होता. या डावात त्याने 12 चौकार आणि 6 गगनचुंबी षटकार मारले होते. त्यानंतरही त्याची धावांची भूक संपली नाही. त्याने दुसऱ्या डावातही शानदार शतक झळकावले. दुसऱ्या डावात पंतने 130 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 13 चौकार आणि 2 षटकार आले. अशाप्रकारे पंतने पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये आपला दबदबा निर्माण केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police Corruption: पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीची तक्रार; खोटा गुन्हा दाखल करण्याचाही केला प्रयत्न

West Bengal Animal Slaughter Ban: सुवेंदू अधिकारी सरकारचा मोठा निर्णय! बंगालमध्ये उघड्यावर पशुबळी देण्यावर घातली बंदी; नियमावलीनं उडवली खळबळ

Goa Agriculture: 'फळांच्या राजा'चा यंदा 'गोडवा' अधिक; उत्पादनात वाढ, काजू पीकही गेल्या वर्षांच्या तुलनेत समाधानकारक

Guru Gochar 2026: नशिबाचा राजा! गुरुच्या नक्षत्र बदलाने 5 राशींच्या जीवनात क्रांती; आरोग्य, संपत्ती आणि सुख-समाधानासाठी सर्वोत्तम काळ

Goa Weather: असह्य उष्म्याने नागरिक हैराण; किमान तापमानाचाही उच्चांक, पारा 36 अंशांवर; मान्सूनपूर्व पावसाअभावाचाही परिणाम

SCROLL FOR NEXT