IND vs ENG: पंत-राहुलचा शतकी दणका! इंग्लंडच्या गोलंदाजांचा जोडीने उडवला फज्जा; नावावर केला मोठा कारनामा

KL Rahul And Rishabh Pant Century: लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात अर्धशतक हुकलेल्या केएल राहुलने दुसऱ्या डावात चमत्कार केला. भारताच्या या प्रतिभावान फलंदाजाने दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले.
KL Rahul And Rishabh Pant Record
KL Rahul And Rishabh PantDainik Gomantak
Published on
Updated on

KL Rahul And Rishabh Pant Century: लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात अर्धशतक हुकलेल्या केएल राहुलने दुसऱ्या डावात चमत्कार केला. भारताच्या या प्रतिभावान फलंदाजाने शतकी खेळी खेळली. त्याच्यानंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतनेही दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले. पहिल्या डावातही ऋषभने शतकी कारनामा करुन इंग्लंडमध्ये आपणच किंग असल्याचे सिद्ध केले.

राहुलची शतकी खेळी

दुसरीकडे, राहुलने 202 चेंडूत शतक झळकावले. राहुलने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 9व्यांदा शतक झळकावले. राहुलचे हे शतक खूप खास आहे, कारण त्याने 2023 नंतर पहिले कसोटी शतक झळकावले. त्याने दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियन कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. राहुलने गेल्या इंग्लंड दौऱ्यातही शतक झळकावले होते. राहुलने आतापर्यंत इंग्लंडमध्ये एकूण 3 कसोटी शतके झळकावली आहेत, तर इंग्लंडमध्ये सर्व फॉरमॅटमध्ये राहुलने पाच शतके झळकावली.

KL Rahul And Rishabh Pant Record
IND vs ENG: बुमराहचा शिकार ठरलेल्या जो रुटचा करिष्मा, क्रिकेटच्या देवाचा मोडला रेकॉर्ड; बनला नंबर 1 खेळाडू

घराबाहेर कसोटीच्या दोन्ही डावात शतक

ऋषभ पंत आता घराबाहेर खेळताना कोणत्याही देशाविरुद्ध कसोटीच्या दोन्ही डावात शतक करणारा जगातील पहिला विकेटकीपर फलंदाज बनला. आजपर्यंत जगातील कोणताही विकेटकीपर कसोटीत असा पराक्रम करु शकला नाही. हे घराबाहेर घडले आहे. 2001 मध्ये, झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीच्या दोन्ही डावात शतक ठोकले होते. त्याने पहिल्या डावात 142 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात त्याने नाबाद 199 धावा केल्या होत्या.

KL Rahul And Rishabh Pant Record
IND VS ENG: गिलची धडाकेबाज कामगिरी, गांगुलीचा 'हा' मोठा विक्रम मोडत रचला इतिहास

राहुल SENA चा कमांडर

आशियातील कोणत्याही फलंदाजाची SENA देशांमध्ये म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये परिक्षा घेतली तर राहुल या कसोटीत अव्वल स्थानी असेल. या उजव्या हाताच्या फलंदाजाने सलामीवीर म्हणून SENA देशांमध्ये 5 शतके झळकावली आहेत. सुनील गावस्कर यांनी SENA देशांमध्ये 8 शतके झळकावली आहेत, जी राहुलपेक्षा जास्त आहेत.

राहुलला इंग्लंड आवडते

सेना देशांमध्ये राहुलला इंग्लंड खूप आवडते. त्याने या देशात एकूण तीन कसोटी शतके झळकावली आहेत, त्यापैकी पहिले शतक 2018 मध्ये झळकावले होते. त्याने 2028 मध्ये ओव्हल येथे शतक झळकावले होते, त्याने 2021 मध्ये लॉर्ड्स येथे शतक झळकावले होते. आता त्याने लीड्समध्ये शतक झळकावून चमत्कार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com