Manish Jadhav
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले येथे खेळला जात आहे.
भारतासाठी पहिल्या डावात 42 धावांची महत्त्वाची खेळी करणाऱ्या केएल राहुलने दुसऱ्या डावातही शानदार फलंदाजी करत आहे.
राहुलने त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर वीरेंद्र सेहवागच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. याशिवाय, त्याने एका खास क्लबमध्ये स्थान मिळवले.
चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात राहुलने शानदार अर्धशतक झळकावले.
सलामीवीर फलंदाज म्हणून कसोटी फॉरमॅटमध्ये सात देशांमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू बनला. त्याने वीरेंद्र सेहवाग आणि मुरली विजयच्या रेकॉर्डशी बरोबरी केली.
राहुलने आतापर्यंत सात देशांमध्ये 9 वेळा 50+ धावा केल्या आहेत.
या यादीत सुनील गावस्कर अव्वल स्थानी आहेत, ज्यांनी 57 डावात 19 वेळा 50+ धावा केल्या आहेत. केएल राहुल, वीरेंद्र सेहवाग आणि मुरली विजय यांनी 9 वेळा 50+ धावा केल्या आहेत.