Goa Football Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: स्पोर्टिंग क्लबने उघडले खाते! चौथ्या स्थानी झेप, मणिपूर क्लासावर 1-0 फरकाने विजय

Sporting Club Vs Manipur Klasa FC: स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने आय-लीग २ फुटबॉल स्पर्धेतील मोहिमेतील पहिला विजय मंगळवारी नोंदविला.

Sameer Panditrao

I League Sporting Club Vs Manipur Klasa FC

पणजी: स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने आय-लीग २ फुटबॉल स्पर्धेतील मोहिमेतील पहिला विजय मंगळवारी नोंदविला. त्यांनी मंगळवारी बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर मणिपूरच्या क्लासा एफसीवर १-० फरकाने विजय नोंदविला.

मागील दोन लढतीतून फक्त एकाच गुणाची कमाई केलेल्या स्पोर्टिंग क्लब द गोवाला"विजयामुळे पूर्ण तीन गुण मिळाले व ते आता तीन लढतीतून चार गुणांसह चौथ्या क्रमांकावर आले आहेत. क्लासा एफसीला तिसरा पराभव पत्करावा लागला. चार लढतीतून फक्त एका गुणासह ते नऊ संघांत आठव्या स्थानी आहेत.

स्पोर्टिंग क्लब द गोवास विजयाचे पूर्ण तीन गुण मिळवून देणारा गोल सामन्याच्या दहाव्या मिनिटास बिस्व दारजी याने दहाव्या मिनिटास भेदक हेडरद्वारे नोंदविला. स्पोर्टिंग गोवाचा स्पर्धेतील पुढील सामना १५ फेब्रुवारीस पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे युनायटेड स्पोर्टस क्लबविरुद्ध होईल.

स्पर्धेत १० गुणांसह अग्रस्थान कायम राखताना मंगळवारी ऐजॉल-मिझोरामच्या चानमारी एफसीने मणिपूरच्या ट्राऊ एफसीचा ७-१ फरकाने धुव्वा उडविला. चानमारी एफसीचा हा चार सामन्यांतील तिसरा विजय ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma: वीरेंद्र सेहवागचा 'तो' ऐतिहासिक विक्रम धोक्यात! ऑस्ट्रेलियात 'हिटमॅन' रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची संधी

Goa Live Updates: कुडतरी चोरीप्रकरणी दोघांना अटक

Mayem Lake: मये तलावाला लवकरच येणार 'अच्छे दिन', जोडरस्त्याच्या कामाचा प्रारंभ; नोव्हेंबरपासून पर्यटनाला चालना

Fatorda Stadium: स्टेडियमसाठी जागा दिलेल्यांना मिळणार घराची मालकी, मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन; विजय सरदेसाईंनी घडवून आणली कुटुंबीयांची भेट

Horoscope: पैशांचा पाऊस पडणार! गुरुवारी अचानक होणार धनलाभ, 'या' 3 राशींचे नशीब चमकेल आणि आर्थिक स्थिती होईल मजबूत

SCROLL FOR NEXT