I League: चर्चिल ब्रदर्सने गमावली नामी संधी! तळातल्या दिल्ली एफसीने रोखले गोलबरोबरीत

Churchill Brothers Vs FC Goa: चर्चिल ब्रदर्सच्या होजे लुईस मोरेना याने ५३व्या मिनिटास केलेल्या स्वयंगोलमुळे दिल्ली एफसीला सलग पाच पराभवानंतर बरोबरीचा एक गुण प्राप्त झाला.
Churchill Brothers Vs FC Goa
I League Churchill Brothers Dainik Gomantak
Published on
Updated on

I League Churchill Brothers Vs FC Goa

पणजी: अग्रस्थानावरील चर्चिल ब्रदर्सने पुन्हा एकदा तळाच्या संघाविरुद्ध दोन गुण गमावले. आय-लीग फुटबॉल सामन्यात मंगळवारी राय पंचायत मैदानावर त्यांना शेवटच्या बाराव्या स्थानी असलेल्या दिल्ली एफसीने २-२ असे गोलबरोबरीत रोखले.

चर्चिल ब्रदर्सच्या होजे लुईस मोरेना याने ५३व्या मिनिटास केलेल्या स्वयंगोलमुळे दिल्ली एफसीला सलग पाच पराभवानंतर बरोबरीचा एक गुण प्राप्त झाला. ज्युनियर ओग्युएन न्केन्गुयए याच्या क्रॉसपासवर मोरेना याने चेंडूवर आपल्याच संघाच्या गोलनेटमध्ये मारला.

Churchill Brothers Vs FC Goa
I League: स्पोर्टिंग क्लब द गोवा खाते उघडणार का? मणिपूरमधील क्लासाविरुद्ध रंगणार लढत

त्यापूर्वी, रफिक अमिनू याने १२व्या मिनिटास गोल केल्यामुळे गोव्यातील संघाने आघाडी घेतली होती. ४१व्या मिनिटास थेट फ्रीकिकवर सॅमसन केईशिंग याने दिल्ली एफसीला बरोबरी साधून दिली, लगेच ४४व्या मिनिटास स्टेन्डली फर्नांडिसने दिल्ली एफसीच्या बचावफळीतील विस्कळितपणाचा लाभ उठवत चर्चिल ब्रदर्सला २-१ अशी आघाडी मिळवून दिली होती. दिल्लीच्या खाती बरोबरी जमा झाल्यानंतर चर्चिल ब्रदर्सने आघाडीसाठी प्रयत्न केले, पण प्रतिस्पर्धी गोलरक्षक लालमुआनसांगा याचा बचाव भक्कम ठरला.

Churchill Brothers Vs FC Goa
I League: चर्चिल ब्रदर्स संधीचा फायदा घेणार का? शेवट स्थानी असलेल्या दिल्लीसोबत होणार सामना

याच मैदानावर तळातील आणखी एक संघ स्पोर्टिंग क्लब बंगळूरने चर्चिल ब्रदर्सला १-१ असे गोलबरोबरीत रोखले होते. त्यांचे आता १४ सामन्यांतून २७ गुण असून अव्वल स्थान कायम आहे, पण दुसऱ्या क्रमाकांवरील नामधारी एफशीपेक्षा (२४ गुण) फक्त तीनच गुण जास्त आहेत. दिल्लीचे आता १४ सामन्यांतून १० गुण झाले असले तरी शेवटच्या क्रमांकात फरक पडलेला नाही. चर्चिल ब्रदर्सचा पुढील सामना १७ फेब्रुवारीस अवे मैदानावर ऐजॉल एफसीविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com