Dempo Club
I League 2025Dainik Gomantak

I League: स्पोर्टिंग क्लब द गोवा खाते उघडणार का? मणिपूरमधील क्लासाविरुद्ध रंगणार लढत

Sporting Club Vs Manipur Klasa FC: आय-लीग २ फुटबॉल स्पर्धेतील सुरवातीच्या दोन सामन्यानंतर फक्त एका गुणाची कमाई केलेल्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.
Published on

I League Sporting Club Vs Manipur Klasa FC

पणजी: आय-लीग २ फुटबॉल स्पर्धेतील सुरवातीच्या दोन सामन्यानंतर फक्त एका गुणाची कमाई केलेल्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. मंगळवारी (ता. ११) त्यांची लढत मणिपूरमधील क्लासा एफसीविरुद्ध बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर होईल.

स्पोर्टिंग गोवाला डायमंड हार्बरविरुद्ध पहिल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला, नंतर चानमारी एफसीविरुद्ध १-१ या गोलबरोबरीनंतर एका गुणाची कमाई करता आली. क्लासा एफसीची कामगिरी उल्लेखनीय नाही. तीनपैकी दोन सामन्यांत पराभव आणि एका बरोबरीमुळे त्यांचाही एक गुण आहे.

स्पोर्टिंग क्लब द गोवा संघ सुरवातीचे दोन्ही सामने अवे मैदानावर खेळला, याविषयी त्यांचे मुख्य प्रशिक्षक आर्मांद कुलासो म्हणाले, की “राज्याबाहेर खेळणे नेहमीच अवघड असते, पण सकारात्मक गोष्ट अशी आहे की आम्ही दोन्ही सामन्यांत गोल केले आणि एक गुण मिळवला.

Dempo Club
I League: 'गोकुळम'च्या विस्कळीत बचावाचा फायदा घेत चर्चिल ब्रदर्सचा विजय, दोन गुण कमावत अग्रस्थानी झेप

आता आम्ही घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यासाठी उत्सुक आहोत. खेळाडू तयार आहेत आणि आम्ही पूर्ण तीन गुण मिळवण्यासाठी सर्वोत्तम खेळ करू.”

स्पोर्टिंग क्लब द गोवाचा कर्णधार दत्तराज गावकर म्हणाला, की “घरच्या मैदानावर परतणे खूप छान वाटते, स्पर्धा नुकतीच सुरू झाली आहे आणि आम्हाला सूर गवसत आहे. घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यातील सामन्यासाठी आम्ही सज्ज असून सर्वोत्तम प्रदर्शन करू.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com