Hyderabad vs Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Hyderabad vs Goa: सलामीचा ॲरन जॉर्ज व सिद्धार्थ राव चेप्याला यांनी शानदार शतके नोंदविताना द्विशतकी भागीदारी रचली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सलामीचा ॲरन जॉर्ज व सिद्धार्थ राव चेप्याला यांनी शानदार शतके नोंदविताना द्विशतकी भागीदारी रचली. त्यामुळे गोव्याविरुद्ध कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात यजमान हैदराबादला पहिल्या दिवसअखेर भक्कम टप्पा गाठता आला.

चार दिवसीय सामन्याला बुधवारपासून हैदराबाद जिमखाना मैदानावर सुरवात झाली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा हैदराबादने ५ बाद ३७३ अशी दमदार धावसंख्या उभारली होती. अखेरच्या सत्रात यजमान संघाने १४ धावांत दोन विकेट गमावल्यामुळे गोव्याला थोडाफार दिलासा मिळाला, पण ॲरन नाबाद असल्याने गोलंदाजांची चिंता कायम आहे.

ॲरन जॉर्ज १८२ धावांवर खेळत आहे. त्याने २२६ चेंडूंचा सामना करताना तब्बल २५ चौकार लगावले. सिद्धार्थ १०१ धावांवर बाद झाला. त्याने १९५ चेंडूंत १५ चौकार मारले. ॲरन व सिद्धार्थ यांनी दुसऱ्या विकेटसाठी २०९ धावांची भागीदारी करून गोव्याच्या गोलंदाजांना सतावले. परिणामी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय पाहुण्या संघाच्या अंगलट आला.

संक्षिप्त धावफलक

हैदराबाद, पहिला डाव: ९० षटकांत ५ बाद ३७३

(ॲरन जॉर्ज नाबाद १८२, वाफी कच्छी १९, सिद्धार्थ राव चेप्याला १०१, प्रद्युम्न चिलमकुर्टी १५, बी. सचित २५, अलंकृत रापोले १०, निशांत रेड्डी नाबाद ९, पुंडलिक नाईक १२-३-४८-१, समर्थ राणे १०-०-५२-०, अनुज यादव २८-२-९१-१, शमिक कामत ८.२-१-५८-०, मिहीर कुडाळकर २०-१-७१-१, यश कसवणकर १०.४-०-४१-१, दिशांक मिस्कीन १-०-३-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

Goa Accident: पेडणेजवळ थरार! महिंद्रा कार खांबावर आदळली, गाडीचा चक्काचूर; नवरा-बायको गंभीर जखमी

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Goa Live News: पंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द!

SCROLL FOR NEXT